२१जुलै दुध बंद आंदोलन : लाक्षणिक एक दिवसीय संप


बांबवडे : दुध उत्पादक दि. २१ जुलै रोजी लाक्षणिक संप असून, शेतकऱ्यांनी दुध डेअरी मध्ये घालू नये. तसेच दुध व्यावसायिकांनी देखील दुध खरेदी न करता, या लाक्षणिक संपाला सहकार्य करावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना शाहुवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सुद्धा आहेत. या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे लाक्षणिक आंदोलन आहे. सदर चे निवेदन विविध दुध संघांना देण्यात आले आहे.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन काळात दुध व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. दुधाची विक्री ४० टक्क्याहून कमी झाली आहे. दुध पावडर व बटर साठे पडून राहिल्यामुळे दुध उत्पादकांना दुध बिले वेळेवर मिळणेबाबत अडचणी निर्माण होवू लागल्या आहेत. तसेच दुध खरेदीचे भाव घसरले आहेत. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशावेळी शासनाने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत.
केंद्र शासनाने दुध आयात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा.
३० हजार टन दुध पावडर चा बफर स्टॉक करावा, तसेच निर्यात अनुदान प्रति किलो ३० रु. देण्यात यावे.
दुध, दुध पावडर, बटर तसेच इतर दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी रद्द करावी.
पुढील तीन महिन्यांसाठी राज्यशासनाने थेट शेतकऱ्याच्या खात्यावर प्रति लिटर ५ रु. अनुदान जमा करावे.
आदी मागण्या असून, या दुध उत्पादक शेतकरी व दुध व्यावसायिक या दोघांच्याही फायद्यासाठी असून, यासाठी २१ जुलै चा लाक्षणिक दुध संप यशस्वी करावा, असे आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
वरील निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग पाटील चरणकर, सुरेश म्हाऊटकर बांबवडे पक्ष तालुकाध्यक्ष, पद्मसिंह पाटील साळशी जिल्हा युवा आघाडी सरचिटणीस, भैय्या थोरात वडगाव, संतोष पाटील सावेकर, गुरुनाथ शिंदे, यशराज म्हाऊटकर, आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!