यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांसाठी २४ तास उपलब्ध : डॉ. जानकरबांबवडे : सध्या कोरोना संक्रमणाचा काळ सुरु आहे. यामध्ये डॉक्टर मंडळींची गरज समाजाला सर्वाधिक असताना, आम्ही सामान्य जनतेसाठी २४ तास उपलब्ध आहोत. केवळ या व्यवसायाकडे नफा मिळवण्याचं साधन म्हणून न पाहता, एक सामाजिक बांधिलकी सुद्धा आहे, हे आमच्यादृष्टीने महत्वाचे असून, स्वत:च्या जीवाची काळजी घेत, सर्वसामान्य रुग्ण सुद्धा वाचवणे, तितकेच महत्वाचे आहे. असा आत्मविश्वास सोबत घेवून, जनतेसाठी आम्ही २४ तास उपलब्ध आहोत, असे मत यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे सर्वे सर्वा डॉ.अभिजित र. जानकर ( M.S. सर्जन ) यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
कोरोना संक्रमण काळात हॉस्पिटल उघडण्यासंदर्भात होय, नाही या विषयासंदर्भात ते बोलत होते. बिकट प्रसंगात आपण आपल्या रुग्णांसाठी ताठपणे त्यांच्यासोबत उभं राहाणं, हे आमचे कर्तव्य आहे, असे डॉ. जानकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये कोण-कोणत्या रोगांवर उपचार केले जातात, याचीही माहिती त्यांनी दिली.
यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे इथं बांबवडे-सरूड रोडवरील पेट्रोल पंप शेजारी आहे. हे हॉस्पिटल रुग्णांसाठी २४ तास सुरु असते. या मध्ये अतिदक्षता ( ICU ) विभाग, सर्जिकल, मॅटर्निटी, अस्थिरोग आदींविषयी औषधोपचार केले जातात. त्याचबरोबर सर्जिरी सुद्धा केली जाते.
इथं पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत सुविधा पुरविल्या जातात. इथं जनरल सर्जरी अंतर्गत अॅपँडिक्स, हर्निया, आतड्याचे सर्व विकार, आतड्याचा पीळ काढणे, होल पडणे याचे ऑपरेशन, पित्ताशायाच्या थैली व खडे काढणे, प्लीहा काढणे, यासारखे ऑपरेशन केले जातात.
युरो सर्जरी अंतर्गत सर्व प्रकारचे मूतखडे, किडनी चे सर्व विकार, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट ग्रंथी चे ऑपरेशन केल जातात.
कँसर सर्जरी अंतर्गत आतड्याचे, स्तनाचे, गर्भाशयाच्या पिशवी चे, किडनीचे, पौरुष ग्रंथी ( Prostet ), यासारख्या सर्व कँसर चे ऑपरेशन इथं केली जातात.
अस्थिरोग अंतर्गत हाडांचे सर्व प्रकारच्या फ्रॅक्चर चे ऑपरेशन, गुडघ्याचा सांधा तुटणे, Amputa करणे, प्लेट व रोड काढण्याचे ऑपरेशन हि केले जातात.
क्रिटीकल केअर मेडिसिन अंतर्गत दमा लागणे, ARDS, थिमेट, हाम्ला, कीटक नाशके, यासारखे पॉयझनिंगचे उपचार केले जातात.
स्त्रीरोग व प्रसूती अंतर्गत नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन, अंग बाहेर येणे, गर्भाशयाची पिशवी काढणे, स्त्रीबीजाच्या गाठी काढणे यासारखे उपचार देखील केले जातात.
कान, नाक, घसा यांचे ऑपरेशन, पॉलीट्रामा, यासारखे उपचार देखी इथं केले जातात. इथं इमर्जन्सी सेवेसाठी तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत. अस्थिरोग तज्ञ, कँसर तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, हृदयरोग तज्ञ आदी तज्ञ सुद्धा रुग्णांसाठी उपलब्ध असतात. अशी माहिती सुद्धा डॉ.जानकर यांनी दिली.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा:९१३०९६४२७३/९९६०८८४२७३.4+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!