…आणि हि कुस्ती देखील त्यांनी जिंकली .


बांबवडे : बांबवडे ता. शाहुवाडी इथं काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझीटीव्ह आलेले एक कुस्तीपटू, आजदेखील कोरोना शी केलेल्या कुस्ती त कोरोना ला धोबीपछाड देवून विजयी झाले आहेत. आजच त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती, त्यांचे चिरंजीव गजेंद्र कोळेकर यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी आपल्या लेकाकडे आलेले कोळेकर, आजारी पडले आणि त्यांना मिरजेला हलविण्यात आले. तिथे त्यांचा कोरोन अहवाल पॉझीटीव्ह आला. आणि बांबवडे त जणूकाही भूकंप झाला, अशी लोकांची प्रतिक्रिया समोर आली. पण त्याच कोळेकारांनी वृद्धापकाळाकडे झुकत असताना, कोरोना शी केलेली कुस्ती यशस्वीरीत्या जिंकली.
समाजाने नेहमी सकारात्मक राहिले पाहिजे. आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही, हे लक्षात ठेवावे. आपण आपली काळजी जरूर घ्यावी, पण दुसऱ्याला अस्पृश्याची वागणूक देवून नव्हे, तर त्यांच्याशी सौजन्याने वागून. असो.
कोळेकर बाबांना दीर्घायुरोग्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!