गोगवे चे सरपंच विकास पाटील यांची अल्पावधीतील “ समाज भरारी ”

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील गोगवे गावचे सरपंच विकास पां. पाटील यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. आज त्यांच्यावर संपूर्ण तालुक्यातून  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मा. आमदार सत्यजित पाटील यांच्या गटाचे ते पिढ्यानपिढ्या समर्थक आहेत. अशा युवा सरपंचांचा घेतलेला एक छोटासा मागोवा…

सरपंच विकास पाटील यांनी खूप कमी वेळेत सरपंच पदापर्यंत यश मिळवले आहे. त्यांचा आजचा जो प्रवास आहे, तो त्यांच्या आजोबांपासून चालत आला आहे. त्यांचे आजोबा, वडील हे माजी आमदार व जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील सरुडकर यांचे खंदे समर्थक होते. आपल्या आजोबांच्या आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, ऐन तारुण्यात त्यांनी सरपंच पदापर्यंत मजल मारली आहे.

या दरम्यान गोगवे गावाच्या सरपंच पदावर विराजमान होत असताना, आमदार सत्यजित पाटील यांच्या सहकार्याने त्यांनी गोगवे गाव ठमकेवाडी, तळपवाडी आदी वाड्यांपर्यंत विकासकामे पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

ठमकेवाडी येथील तलावातील गाळ काढला आहे, दलितवस्ती मध्ये रस्ता काँक्रीटी करण केले आहे. गोगवे, ठमकेवाडी, तळपवाडी इथं ग्रामस्थांना बसण्यासाठी बेंच बसविले आहेत. ठमकेवाडी शाळा दुरुस्तीकरण केले आहे. तसेच गोगवे शाळेजवळील ग्राउंड चे सपाटीकरण केले आहे. गोगवे स्मशानभूमी, तसेच पिक-अप शेड तयार केले आहे. गोगवे गावातील तलावाचा गाळ काढून सुशोभीकरण केले आहे. गोगवे, ठमकेवाडी, तळपवाडी, येथील शाळांना कंपाऊंड केले आहे. तळपवाडी इथं पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाईपलाईन तयार करून घेतली आहे.  गावातील माळवाडी इथं पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. गोगवे, ठमकेवाडी, तळपवाडी येथील गटर्स ची कामे पूर्ण केली आहेत. गावातील माने गल्ली इथं रस्ता काँक्रीटीकरण केले आहे. चर्मकार समाजमंदिर उभारणी केली आहे. गोगवे. तळपवाडी इथं मा.. आमदार सत्यजित पाटील ( आबा ) यांच्या फंडातून रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. गावात मा. खासदार राजू शेट्टी यांच्या फंडातून हॉल चे बांधकाम पूर्ण केले आहे. आदी  माहिती गोगवे गावचे विद्यमान सरपंच विकास पां. पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून ‘ एसपीएस न्यूज ’ ने घेतलेल्या मुलाखतीत सांगितले.

5+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!