वारणा कोतोली च्या सरपंचपदी संपत पाटील यांची बिनविरोध निवड


शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यातील वारणा कोतोली ग्रामपंचायत च्या नूतन सरपंच पदी संपत ज्ञानदेव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या ग्रामपंचायत च्या प्रथम लोकनियुक्त सरपंच पदी पांडुरंग आचरे तात्या यांची निवड करण्यात आली होती. त्यांचा कालावधी ठरल्याप्रमाणे संपल्यानंतर, त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर संपत ज्ञानदेव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन सरपंच हे शाहुवाडी पंचायत समिती चे माजी उपसभापती तसेच विद्यमान सदस्य दिलीप पाटील ( भाऊ ) यांचे थोरले बंधू आहेत. हि मंडळी मा.आमदार सत्यजित पाटील सरुडकर ( आबा ) यांचे हे कट्टर समर्थक आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदय साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन गणपती पाटील ( दादा ) हे होते. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी जाधव यांनी काम पहिले. तसेच ग्रामसेवक, डे.सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!