तालुक्यात ‘ रॅपीड अँटीजेन टेस्ट ‘ होणार : आरोग्य सभापती हंबीरराव पाटील बापू


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील पेरीड येथील कोविड केअर सेंटर मध्ये रॅपीड अँटीजेन टेस्ट सुरु करण्यात आली असून, इथं तत्काळ कोविड चा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेला होणारा तपासणी नंतर चा मानसिक त्रास थांबणार आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहून, प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हापरिषद चे बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील ( बापू ) यांनी केले आहे.
यावेळी श्री पाटील पुढे म्हणाले कि, या रॅपीड अँटीजेन टेस्ट मुळे कोविड चे दुषित रुग्ण तत्काळ समजून येतील, त्यामुळे त्यांच्यावर त्वरित औषधोपचार करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता, लक्षणे जाणवल्यास, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा,जेणेकरून त्वरित उपचार मिळतील.
या उद्घाटन प्रसंगी विजयराव बोरगे जि.प.सदस्य, विजयराव खोत उपसभापती शाहुवाडी पंचायत समिती, डॉ. एच.आर.निरंकारी तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. दिपाली जद, डॉ. विनोद झाडे, श्री. सुभाष यादव आरोग्य सहाय्यक, अरुण मगदूम प्रयोगशाळा वैधानिक अधिकारी, तसेच कोविड केअर सेंटर पेरीड येथील डॉक्टर्स व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

2+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!