बांबवडे त गणेशोत्सव रद्द : सर्व गणेशोत्सव मंडळांचा निर्णय


बांबवडे : बांबवडे ता. शाहुवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घोषित केला असून, तशा आशयाचे निवेदन या गणेशोत्सव मंडळांनी शाहुवाडी पोलिसांना दिले आहे.
बांबवडे इथं झालेल्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान बांबवडे इथं आज रस्ता रोको आंदोलन जाहीर करण्यात आले होते. तशा आशयाचे पत्र येथील सर्व गणेशोत्सव मंडळांनी शाहुवाडी तहसीलदार कार्यालय तसेच पोलिसांना दिले होते. यावेळी हा रस्ता रोको आंदोलन रद्द करण्यात आले. बांबवडे हे कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या कोरोना संक्रमण काळात झपाट्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येला ध्यानात घेता, या काळात प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी येथील सर्व गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येत, सार्वजनिक गणेशोत्सव न साजरा करण्याचा निर्णय घेतला.
तशा आशयाचे निवेदन सर्व मंडळांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील एस.एच. यांच्या हाती सुपूर्द केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सराटे मॅडम व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

9+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!