शैक्षणिक शुल्क शासनाच्या नियमाप्रमाणेच घ्यावे- राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस शाहुवाडी


बांबवडे : सध्या कोरोना संक्रमणाचा काळ सुरु असून, अशा परिस्थितीत सगळ्यांच्याच आर्थिकमानावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. तेंव्हा कोणत्याही शिक्षण संस्थांनी विद्यार्थी किंवा पालकांवर अतिरिक्त शुल्कवाढ करू नये. शुल्कवाढ केल्यास पालक तसेच विद्यार्थी यांना समजावून सांगावे, शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थी व पालक यांना नाहक त्रास झाल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस आक्रमक भूमिका घेईल, अशी भूमिका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी मांडली आहे. तशा आशयाचे निवेदन शिव शाहू महाविद्यालय सरूड चे प्राचार्य गौतम आळतेकर यांना राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष सुरज बंडगर यांनी दिले आहे.
दरम्यान सध्या कोरोना संक्रमणाचा काळ सुरु असून याचा फटका सर्वसामान्य जनतेला अधिक बसला आहे. यामध्ये शैक्षणिक संस्था सुद्धा अपवाद नाहीत. याकरिता शैक्षणिक संस्थांनी शुल्क निश्चिती आणि विद्यार्थ्याकडून शुल्क मागणी चे धोरण विद्यर्थ्याना विचारात घेवून शुल्क निश्चिती चे धोरण ठरवावे. शासनाने सूचित केल्याप्रमाणे कोणत्याही शैक्षणिक संस्थेने शुल्कवाढ करू नये. शक्य असेल तेवढे शुल्क पालकांना विचारात घेवून कमी करावे. निश्चित केलेले शुल्क टप्प्या टप्प्याने भरण्याचा आराखडा तयार करावा. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांवर शुल्क भरण्यास जबरदस्ती करू नये. आदी मुद्द्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे. अशी माहितीही तालुकाध्यक्ष सुरज बंडगर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!