गणेश पोवार यांची कृषी पदवीधर संघटनेच्या युवक अध्यक्ष शाहुवाडी तालुका पदी निवड


बांबवडे : डोणोली ता. शाहुवाडी येथील श्री गणेश बाजीराव पोवार यांची कृषी पदवीधर संघटनेच्या युवक अध्यक्ष शाहुवाडी तालुका पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र देखील संघटनेच्या वतीने त्यांना देण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कृषी पदवीधर संघटना हि, महाराष्ट्रातील कृषी व संलग्न पदवीधर बांधवांची सर्वोच्च संघटना आहे. या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पदवीधर युवक, विद्यार्थी, शेतकरी यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वापर करावा, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश कडूस पाटील यांच्या स्वाक्षरी ने हे नियुक्ती पत्र गणेश पोवार यांना देण्यात आले आहे.

9+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!