” पाठीवर शिवरायांची सावली, आणि छातीवर सेनेची माऊली ” , ” साहेब ” : विजय लाटकर वाढदिवस

.


बांबवडे : समाजात नेहमी नेत्याला किंमत असते. परंतु हे नेतृत्व कार्यकर्त्यांच्या मोहोळातून तयार होत असतं. म्हणून प्रथम कार्यकर्ता महत्वाचा असतो. ” पाठीवर शिवरायांची सावली, आणि छातीवर सेनेची माऊली ” , ” साहेब ” कोरलेल्या शिवसैनिकांवर आजपर्यंत शिवसेना ताठ मानेने उभी आहे. अश्याच एका भगव्या कार्यकर्त्याचा आज वाढदिवस आहे. नेहमीच शिवसेनेच्या जयघोषात रममाण असणाऱ्या कार्यकर्त्यापैकी हे एक ” भगवं वारं “. विजय कुमार लाटकर बांबवडे शिवसेना उपशहरप्रमुख . बांबवडे तालुका शाहुवाडी येथील हे भगवं वारं नेहमीच सेनेच्या तळातील फळीत काम करीत आलं आहे. अशा या भगव्या शिवसैनिकाला साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. आज दिवसभर अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होणारच आहे.
‘ विजय लाटकर ‘ हे नाव तसं वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नजरेत कधी आलं नसेल, पण आमच्या नेहमीच लक्षात येतं. कारण शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनाला हा कार्यकर्ता नसेल, असं कधी झालं नाही. नेहमी हिंदुत्ववादी विचारांचं वादळ डोक्यात भिनभिनणार हे व्यक्तिमत्वं आहे.
सेनचे सेनाप्रमुख, सगळ्यांचे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय ” साहेबांनी ” सुद्धा पदाधिकाऱ्यांपेक्षा सामान्य शिवसैनिकावर जास्त विश्वास ठेवला. म्हणूनच आज ” साहेब ” प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर विराजमान आहेत. अशाच साहेबांचा हा लाडका शिवसैनिक. कारण ह्या व्यक्तीच्या डोक्यातून ” साहेब ” कधी बाहेर गेलेले नाहीत.
अशाच अनेक भगव्या वाऱ्यांमुळे शिवसेनेचे वादळ , आजही तितक्याच ताकदीने घोंघावत आहे. ह्या भगव्या वाऱ्याला, आणि सेनेच्या भगव्या मावळ्याला, मनापासून शुभेच्छा.
” हि लाट ना राजकारणाच्या वाऱ्याची, ना कोणत्या पदांच्या अपेक्षांची,
हि लाट आहे, हिंदुत्वाची, साहेबांच्या भगव्या विचारांची !! “

2+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!