सिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा


बांबवडे : आज पुन्हा एकदा गायकवाड गटाच्या नव्या नेतृत्वाची प्रकर्षाने जाणीव झाली. आज २७ सप्टेंबर , एका नव्या नेतृत्वाच्या आशेची किरणे गायकवाड गटाच्या जनतेच्या मनात ज्यांनी रुजवली, त्या नेतृत्वाचा आज जन्मदिवस. ते म्हणजे रणवीर सिंग गायकवाड युवा शक्ती चे संस्थापक व उदय साखर चे संचालक रणवीरसिंग गायकवाड होत. त्यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
त्यांच्या वाढदिवसानिमित त्यांच्या व्यक्तिमत्वावर टाकलेला प्रकाशझोत.
रणवीरसिंग गायकवाड म्हणजे सिंहाच्या पोटी जन्मलेला नवा ” छावा ” होय. या व्यक्तिमत्वाने तसं पाहिलं, तर जनमानसांवर आपल्या प्रतिमेची मोहर स्वत:च उमटवली. एकेकाळी तहसीलदार कार्यालयाला टाळे ठोकून सुरु केलेलं समाजकारण, आजही लोकं विसरलेली नाहीत. त्यावेळी सुरुवातीला टाकलेलं भक्कम पाऊल , आज त्यांना नेतृत्व पदाकडे घेवून निघालं आहे. ” आबा, हा मानसिंग दादांचा छावा तुमच्यासोबत आहे “, अशी दिलेली हमी, त्यांचं व्यक्तिमत्व त्याचवेळी फुलवून गेली. काही कारणांमुळे झालेला पराभव, कुरवाळत न बसता, सुरु ठेवलेलं मार्गक्रमण त्यांच्यामध्ये आलेली प्रगल्भता दर्शवते.
सरकार, आज खऱ्या अर्थाने गायकवाड गटाला एका दमदार नव नेतृत्वाची गरज आहे.. केवळ निवडणुकीपुरतं भूछत्र न बनता, या गटाच्या रथाचा सारथी बनण्याची आज गरज आहे. हि गोष्ट कोणत्याही सामान्य कार्यकर्त्याला एकांतात विचारलात, तर याची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही.
तेंव्हा ” पुनश्च हरिओम ” म्हणण्याची वेळ आली आहे. पुन्हा एकदा गटाला एकत्र बोलवून त्यांची विचारपूस करण्याची गरज आहे. अन्यथा कोरोना सारख्या आलेल्या त्सुनामीत तुमच्या गटाचा सामान्य कार्यकर्ता वाहून जाईल. आणि त्याचं खापर पुन्हा त्याच जनतेवर फुटेल. आज तुम्ही एक साद घातलीत, तर लाखो प्रतिसाद उमटतील. पुन्हा एकदा आपल्या वाढदिवसानिमित्त आपणास लाखो शुभेच्छा…
यकिन रख अपने हौसलों पे , उडान तो, आपने आप हि भर दोगे ,
बद्किस्मती की क्या हैं मजाल, जो चट्टानों भीड देंगे …

4+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!