“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस

बांबवडे : नवक्रांती चे बीज तू, अध्यात्माची नीज तू, समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू…
अशीच बिरुदावली आपल्या कार्यकर्तुत्वातून मिळवलेलं एक व्यक्तिमत्वं, सह्याद्रीच्या कुशीत अंकुरत आहे. समाजसेवेच्या व्रताने गेल्या तीन वर्षात हे व्यक्तिमत्वं भारावलेलं आहे. कुणासाठी शेतीची अवजारं मिळवण्याचा प्रयत्न केला, तर कुणा अपंगासाठी झेरॉक्स मशीन मिळवून दिलं. देशाच्या उज्वल भवितव्यासाठी गळणाऱ्या शाळांचं नव इमारतीत रुपांतर केलं, तर कुणा माताभगीनीसाठी वैरणीचा त्रास कमी व्हावा, यासाठी कडबा कुट्टी उपलब्ध करून दिली. जिल्हा परिषद सदस्य पदाचा सुयोग्य वापर करून खऱ्या अर्थाने जनसामान्य रुपी नारायणाची सेवा करणारं हे व्यक्तिमत्वं आज पन्नाशीत पदार्पण करीत आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. ते व्यक्तिमत्वं म्हणजे सन्माननीय विजयराव बोरगे पैलवान होय. त्यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. या वाढदिवसाचं औचीत्त्य साधून,त्यांच्या कार्यकर्तुत्वावर टाकलेला एक प्रकाशझोत…
एकेकाळी एक साधा माणूंस म्हणून वावरणारं हे व्यक्तिमत्वं, आज मात्र सर्वसामान्यांसाठी एक आशेचा किरण बनलं आहे. जिल्हा परिषद सदस्य पद कंत्राटदार , सोडून सर्व सामान्य जनतेसाठी सुद्धा कसं गरजेचं आहे, हे पैलवानांच्या त्या पदावर पोहचल्यावर कळलं. कारण छोट्या छोट्या गोष्टी कशा शेतकऱ्याच्या गरजेसाठी उपयोगी पडतात, ते आत्ता लोकांना कळू लागलं आहे.
या माणसांन आजवर पदावर रुजू झाल्यापासून, लोकांच्या गरजेचं काय ? एवढंच पाहिलं. इथला सर्सामान्य वर्ग पोरंबाळं मुंबई ला नोकरीधंद्या साठी असल्याने त्यांच्या पैशावर जगत असतो. अशावेळी वृद्धापकाळाने निधन झाल्यास, मुलं गावाकडं येईपर्यंत, लोकं वाट पहात नसंत. त्यामुळे मुलांना, त्यांच्या आईवडिलांचं अंत्यदर्शन मिळत नसंत, याकारणाने बोरगे साहेबांनी आरोग्य केंद्रात शीतपेटी मिळवून आणण्याचं महत्वाच कार्य केलं. यामुळे निदान मुलांना अंत्यदर्शन मिळेल, याबाबत शंका नाही. त्याचबरोबर अनेक गावात स्मशान शेड ची वानवा होती, त्यापैकी बऱ्याच गावांना स्मशान शेड पुरविण्याचं काम पैलवानांनी प्राधान्यानं केलं. अशी लोकोपयोगी अनेक कामे या माणसाने मनापासून केलीत.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. याचबरोबर या गोड प्रसंगाच्या औचित्याने स्वखर्चातून त्यांनी सॅनीटायझर, मास्क संतूर साबण अशा गोष्टी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वाटल्या आहेत. या अगोदर काडसिद्धेश्वर मठातील प्रतिकारशक्ती मात्रा चे वाटप करण्यात सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. एवढेच नव्हे, तर घुंगुर सारख्या दुर्गम गावांच्या वाड्यांमध्ये सुद्धा मास्क, साबण, सॅनीटायझर, पोहचवले आहेत. या वितरण प्रणालीत विजयराव बोरगे प्रेमी ग्रुप चा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर पुष्कराज क्षीरसागर, विक्रम पाटील, हर्षवर्धन पाटील, आणि अनेक ज्ञात अज्ञात हितचिंतक, जे बोरगे साहेबांवर प्रेम करतात, अशा मंडळींनी सुद्धा या कार्यात हिरीरीने आपला सहभाग नोंदवला आहे.
असं हे व्यक्तिमत्वं केवळ राजकारण करीत नसून, समाजकारणात सुद्धा अग्रेसर आहे, हे त्यांच्या कृतीतून समोर येत आहे. त्यांचा कड्याकपारींशी असलेला सुसंवाद, लवकरच आपल्या पर्यंत आम्ही पोहचवणार आहोत. अशा या तळागाळातल्या नेतृत्वाला उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

4+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!