चप्पल व्यवसायातील विश्वासाचं ठिकाण:माऊली फुटवेअर,बांबवडे


बांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी येथील ” माऊली फुटवेअर ” हे गेल्या सात वर्षापासून आपल्या ग्राहकांना विनम्र सेवा देत आहेत. १३ ऑक्टोबर २०१३ रोजी साळशी येथील पोवार बंधूंनी आपला व्यवसाय बांबवडे इथं सुरु केला. आणि आज सात वर्षांनी त्यांच्या व्यवसायाचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे. हे आपणास पहावयास मिळत आहे. ” माऊली फुटवेअर ” हे बांबवडे येथील नामांकित आणि विश्वासार्हतेचं महत्वाचं ठिकाण आहे. त्यांच्या ह्या वर्धापन दिन सप्ताहात त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
यावेळी एसपीएस न्यूज शी बोलताना, पोवार बंधू सांगतात कि, आज सात वर्षे व्यवसाय सुरु करण्याला झाली असून, व्यवसायवर आमची नितांत श्रद्धा आहे. बांबवडे येथील घोडे-पाटील कॉम्प्लेक्स मध्ये हा व्यवसाय गेली सात वर्षे अविरतपणे सुरु आहे. बांबवडे पंचक्रोशीतील सर्व सामान्यांचं नेतृत्व असलेले स्व. अशोकराव घोडे-पाटील उर्फ भाऊ यांचे प्रोत्साहन आणि सहकार्य हे देखील या व्यवसायासाठी महत्वाचे होते. भाऊ आज हयात नाहीत , पण त्यांचे आशीर्वाद सतत आमच्यासोबत आहेत. ग्राहकांची संतुष्टी हेच आमचं समाधान आहे. इथं वेगवेगळ्या व्हरायटी च्या चप्पल आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर शूज, सँडल्स, स्लीपर्स, फॉर्मल चप्पल योग्य दरात उपलब्ध आहेत.
आपल्या इथं वूडलँड, रेड चीफ, स्पार्क, अॅक्शन, कॅम्पस , लान्सर, पॅरॅगॉन, व्हीकेसी प्राईड, लुनार्स,यासारख्या अनेक ब्रँडेड कंपनीचे शूज, चप्पल उपलब्ध आहेत. या कंपनीचे आपण अधिकृत विक्रेते आहोत. त्याचबरोबर याठिकाणी फॅशनेबल शूज, चप्पल, कोल्हापुरी चप्पल सुद्धा मिळतात. तसेच वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वापरण्यास योग्य असलेली , त्याचबरोबर काही शुगर पेशंट्स साठी ज्या चप्पल लागतात, त्यासुद्धा आपण इथं उपलब्ध करून ठेवत आहोत.
सध्या देशभर कोरोना सारख्या महामारी ने थैमान घातलं आहे. परंतु सध्या आपण धैर्याने त्यातून खबरदारी घेत, मार्ग काढीत आहोत. अशा परिस्थितीत सगळ्यांचेच आर्थिकमान घटले आहे. तरीसुद्धा सकारात्मकतेने विचार करून, यावर मार्ग काढू या. याचबरोबर नव्या पर्वणीला सामोरे जाताना , ग्राहकांचे आर्थिकमान सांभाळत, वेगवेगळ्या व्हरायटीच्या चप्पल ग्राहकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करीत आहोत, ग्राहकांनी एकदा येवून खात्री करावी, असे आवाहन देखील विठ्ठल पोवार व नामदेव पोवार बंधू साळशीकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले आहे.

12+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!