“स्वामी कलेक्शन” एक भरवशांचं, आणि हक्काचं दालन


बांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी इथं फॅशनेबल ड्रेसेस व दर्जेदार कपड्यांसाठी ” स्वामी कलेक्शन” हे दर्जेदार दालन नव्या स्टॉक सहित ग्राहकांसमोर येत आहे. याचबरोबर दर्जेदार अंडरगार्मेंट्स, लहान मुलांचे कपडे आदी माल, विविध व्हरायटींसह दसरा सणाच्या अनुषंगाने ग्राहकांसाठी उपलब्ध होत आहे. अशी माहिती स्वामी कलेक्शन बांबवडे चे मालक अमित चौगुले आणि बंधू यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.
स्वामी कलेक्शन हे कपड्यांसाठी अल्पावधीतच प्रसिद्धीस येत असलेलं दोन मजल्यांचं दालन, अंबीरा पुलाशेजारी आहे. दारात पार्किंग ची व्यवस्था, डेबिट, क्रेडीट कार्ड, फोन -पे, गुगल -पे आदी पैसे देण्याच्या सुविधा सुद्धा इथं उपलब्ध आहेत. ग्राहकांचा विश्वास आणि विनम्र सेवा स्वामी कलेक्शन आपल्या ग्राहकांना गेल्या तीन वर्षांपासून देत आलं आहे. म्हणूनच आपल्या आशीर्वादाने चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहोत.या सुविधांचा लाभ येथील जनतेने घ्यावा,असे आवाहन स्वामी कलेक्शन च्यावतीने करण्यात येत आहे.
आज अवघा देश कोरोना सारख्या अभूतपूर्व संकटाशी अत्यंत संयमाने,संघटीत पणे लढत आहे. परंतु भले, बुरे ते घडून गेले, विसरून जावू सारे क्षणभर, असे म्हणत नव्या सकारात्मक उर्जेने , आत्मविश्वासाने नवी पावले टाकण्याची गरज आहे. आपल्या कठीण प्रसंगात आम्ही आपल्यासोबत आहोतच, परंतु नव्या उर्जेने पुन्हा एकदा नवी वस्त्रे परिधान करून आयुष्याची नवी वाटचाल करू या.
चातुर्मास संपताच नवरात्रीचा उत्सव समोर येत आहे, याचबरोबर दसरा हा सण येत आहे. ” दसरा सण मोठा , नाही आनंदाला तोटा ” , ह्या सणाला नवीन कपडे खरेदी, हि एक संपूर्ण कुटुंबाला नवी पर्वणी असते. मागील कोरोना च्या कटू आठवणी बाजूला सारून नव्या सणाचा उपभोग घेण्यासाठी, या पर्वणीला स्वामी कलेक्शन ने विश्वासाची, दर्जेदारपणाची जोड दिली आहे.
इथं मिळताहेत पैठणी , पारंपारिक साड्या, डिझायनर साड्या, त्याचबरोबर ब्रँडेड रेडीमेड्स, सुटींग, शर्टिंग, मध्ये सुद्धा आपल्याला व्हरायटी पाहायला मिळतील.
सर्व कुटुंबाची कपड्यांची खरेदी, याचबरोबर नव्या डिझाईन च्या साड्या, टी-शर्टस , रेडीमेड कपडे, याचबरोबर लहान मुलांचे कपडे अनेक व्हरायटी मध्ये आपणास इथं पहावयास मिळतील. म्हणूनच ग्राहकांच्या विश्वासाला अल्पावधीतच पात्र ठरलेलं स्वामी कलेक्शन आपली वाट पहातंय. एकदा या आणि खात्री करा.
” स्वामी कलेक्शन ” एक भरवशांच, आणि हक्काचं दालन.

5+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!