मतदारसंघासाठी ” देवदूत ” ठरलेले कोरोना योद्धा : जि.प.स. विजयराव बोरगे


बांबवडे : कोरोना संक्रमण काळात संपूर्ण मतदारसंघात मास्क,सॅनिटायझर, साबण वाटप करणाऱ्या बांबवडे जि.प. मतदारसंघाचे सदस्य विजयराव बोरगे यांनी पत्रकारांसाठी सुद्धा मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर चे वाटप करीत पत्रकार बांधवांना अल्पोपहार सुद्धा दिला.
कोरोना काळात, या व्यक्तीने केवळ एवढेच काम केले ,असे नव्हे, तर रुग्ण पोहोचविण्यासाठी आपली गाडी दिली. त्याचबरोबर जिथे इंजेक्शनची कमतरता होती, ते पोहचविण्याची व्यवस्था केली. अशाप्रकारची रुग्ण सेवा क्वचितच पहावयास मिळते. आजवर अनेक मंडळींनी पदे भूषविलीत, पण खऱ्या अर्थाने ” आपला माणूंस ” हे नाव या व्यक्तिमत्वाने सार्थ ठरविले. त्यांचे नेते मानसिंग दादा, माजी आमदार सत्यजित पाटील या मंडळींच्या सहकार्याने आपण हे करू शकलो, अशी कृतज्ञता व्यक्त करण्यास देखील हि व्यक्ती विसरली नाही. हे सर्व करीत असताना, आमच्या पत्रकार बांधवांना सुद्धा त्यांनी या काळात औषधोपचारासाठी सर्वतोपरी मदत केली. रस्त्याने जाताना गुरं राखणाऱ्या मुलांसाठी सुद्धा त्यांनी मास्क दिले.

Advt.


याचबरोबर जि.प. च्या शाळांमधून मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर , थर्मल गन शाळेच्या विद्यार्थ्यांना पुरवून खऱ्या अर्थाने देशाच्या उज्वल भविष्याचे त्यांनी रक्षण केले आहे.

Advt.


असा ‘ आपला माणूंस ‘ खऱ्या अर्थाने मतदारसंघातील जनतेसाठी देवदूत ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अशा कोरोना योद्धा ठरलेल्या विजयराव बोरगे यांना शाहुवाडी तालुका पत्रकारसंघ, तसेच शाहुवाडी प्रेस क्लब च्या वतीने त्यांचे आभार मानले, त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Advt.


यावेळी शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद पवार, सुभाषराव बोरगे, डी.आर. पाटील सर, चंद्रकांत मुदुगडे, अमर पाटील, बाबासाहेब कदम, आर.डी. पाटील, संजय रोडे-पाटील, रमेश डोंगरे आदी पत्रकार उपस्थित होते.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!