माणुसकीची उंची गाठणारे उपसभापती : विजयराव खोत


बांबवडे : शाहुवाडी तालुक्याला कमी वयाचे लाभलेले उपसभापती विजयराव खोत यांनी वयाची उंची बाजूला ठेवून माणुसकीची उंची खऱ्या अर्थाने या कोरोना काळात गाठली. त्यांनी उत्तर भागातील अनेक लोकांना आरोग्याच्या सुविधा पोहोचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. यावरून असे कळते कि, ज्याला खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करायची आहे , त्याला वय, आणि अनुभव याची गरज नसते. गरज असते, ती फक्त इच्छा शक्तीची. असेच शाहुवाडी पंचायत समिती चे विद्यमान उपसभापती विजयराव खोत यांनी आपली कामगिरी या कोरोना काळात चोख बजावून, जनतेकडून शंभर टक्के मार्क मिळवले आहेत. कारण हि चर्चा जनतेतून होत आहे.

Advt.


विजयराव खोत पंचायत समितीतील तरुण पदाधिकारी आहेत. पण कामाची जिद्द, आणि लोकांशी असलेला जनसंपर्क या गोष्टी पाहता त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. ते लोकांपर्यंत स्वत: पोहचले. त्यांना कुठे कशाची गरज लागते. कुठे बेड उपलब्ध आहेत, कुठे इंजेक्शन ची गरज आहे, कुठे ऑक्सिजन ची गरज आहे, या गोष्टी जातीनिशी पाहिल्या. आणि त्या जनतेपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

Advt.


तसे पाहता विजयराव उपसभापती म्हणून कधी मिरवलेच नाहीत. कोणाला कशाची गरज आहे, याकडे त्यांनी निवडून आल्यापासून जातीनिशी लक्ष दिले आहे. त्यानंतर तालुक्यावर ओढवलेले हे कोरोना चे संकट. या काळात त्यांनी खऱ्या अर्थाने जनसेवा केली. स्वत:च्या गाडीतून लोकांना पोहचविले. यात आपल्याला कशाची लागण होईल, हि बाब गौण ठेवली. अशा धाडशी तरुण लोकप्रतिनिधीला आमचा सलाम. खऱ्या अर्थाने लोकांमध्ये उपसभापती, या पदाची किंमत करून, रुग्णसेवा महत्वाची मानली, आणि त्या पदाला खऱ्या अर्थाने गौरव प्राप्त करून दिला.

Advt.


म्हणूनच अशा तालुक्यातील सर्वच ज्ञात, अज्ञात कोरोना योद्ध्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज विनम्र अभिवादन करीत आहे.

5+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!