कुणी ” ईडी लावली,कि, आम्ही सीडी लावू ” -श्री एकनाथ खडसे : खडसेंच्या मनगटी घड्याळ


मुंबई : महाराष्ट्रात अनेक दिवस सुरु असलेलं पक्षप्रवेशाचं सत्र अखेर एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेवून संपलं आहे. खडसे यांनी मनगटी राष्ट्रवादी चं घड्याळ बांधलं आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ढवळाढवळ सुरु होणार आहे. यावेळी त्यांनी सांगितले कि, ” कुणी ईडी मागे लावली कि, आम्ही सीडी लावू. ” असे सांगत जळगावातील राजकारण निश्चित तापणार आहे. यावेळी भाजप ने मला अडगळीत टाकले. तर माझ्यावर अनेक आरोप केले. स्त्री ला समोर ठेवून माझ्यावर गुन्हे दाखल केले. अशी त्यांनी खंत व्यक्त केली. त्यांच्या फटकेबाज भाषणावरून भविष्यातील राजकारण तापणार आहे, असे दिसून आले.

Advt.


यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले कि, नाथाभाऊ म्हणजे शब्दाला जागणारा माणूस आहे. जे बोलेल ते निश्चित खरे करून दाखवणार. ते जेंव्हा प्रवेश कर्ते झाले, तेंव्हा त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा केलेली नाही तेंव्हा खातेबदल सध्यातरी नाही, असे संकेत पवार साहेबांनी दिले.

Advt.


यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले कि, टायगर अभी जिंदा है , पिक्चर अभी बाकी है ,असे खोचक वक्तव्य करीत भाषणाची फटकेबाजी केली.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!