स्व. आम. संजयदादां च्या स्वप्न पुर्तीसाठीच राष्ट्रवादीत प्रवेश- योगीराजसिंह गायकवाड ( सरकार )


बांबवडे : स्व.आम.संजयदादांच्या स्वप्नपूर्तीसाठी च आम्ही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असून, तळागाळातील जनतेच्या सेवेसाठीच हे पाऊल उचलले आहे. असे मत स्व. आम. संजयदादांचे कनिष्ठ पुत्र योगीराजसिंह गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
योगीराजसिंह गायकवाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रवेशानंतर पहिलीच पत्रकार परिषद बोलवली होती. यावेळी योगीराजसिंह यांनी वरील उद्गार काढले.

Advt.


यावेळी पत्रकारांनी विचारले कि, याबाबत आपल्याच एकाच घरात दोन पक्ष झाले असून, आपल्या प्रवेशामुळे घरात कलह निर्माण होणार नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना योगीराज म्हणाले कि, आम्हाला घरातून जनसेवेची शिकवण मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आप आपल्यापरीने जनसेवा करीत असतो, यामध्ये कलह निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. राज्याचे ग्रामविकासमंत्री नाम. हसन मुश्रीफ यांची काम करणेची पद्धत, हि स्व.आम. संजयदादांसारखीच आहे. त्यामुळे त्यांच्या पद्धतीनेच तालुक्यात दादांची उरलेली विकासकामे पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. दादांनी तालुक्यात मध्यम पाटबंधारे तलाव बांधून, शेतकऱ्यांच्या उशाशी पाणी नेवून ठेवले. त्यांच्या पुढील अनेक विकासकामांची अद्याप पूर्तता झालेली नाही. दरम्यान स्व. आम. संजयदादांनी बांबवडे इथं मंजूर केलेले क्रीडा संकुल अद्यापही अपूर्णच आहे. यावर चार पंचवार्षिक उलथून गेल्या, तरी अद्याप ह्या कामाची पूर्तता झालेली नाही. त्याचबरोबर या क्रीडा संकुलाला आम. संजयदादांचे नाव मिळावे, यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न असणार आहेत. अशा दादांच्या अनेक अपुऱ्या कामांना पूर्ण करण्याचा आमचा निश्चय आहे.

Advt.


एकंदरीत आमचा कोणत्याही विकासकामाला विरोध असणार नसून, राज्याचे नेते पवारसाहेब व मुश्रीफसाहेब यांच्या सहकार्यातून तालुक्यात पुन्हा एकदा संजयदादांच्या विकास कामांसारखे, विकासाचे वादळ वाहणार आहे, याची आम्ही ग्वाही देतो. इथून मागे झालेल्या चुका सुधारून, पुन्हा एकदा तालुक्यात नवविचारांचे वारे वाहतील. यासाठी नाम.मुश्रीफ साहेब यांचे सहकार्य लाभणार आहे. दरम्यान आठवड्यातील दोन दिवस तालुक्यातील विकासकामांसाठी मी स्वत: बांबवडे त थांबणार आहे. यासाठी बांबवडे इथं कार्यालय सुद्धा स्थापन करण्यात येईल, असेही योगीराज यांनी यावेळी सांगितले.

Advt.


यावेळी संदीप केमाडे यांनी स्वागत केले,तर विद्यानंद यादव यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार मानले. यावेळी आदित्य इंगवले, विजय पाटील थेरगाव, उत्तम पाटील सुपात्रे, प्रमोद घाटगे सैदापूर व कार्यकर्ते उपस्थित होते.

4+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!