ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेलं स्वामी कलेक्शन : दिपावलीच्या शुभेच्छा

बांबवडे : अल्पावधीतच प्रसिद्धीस आलेलं स्वामी कलेक्शन यांच्या अनेक वैशिष्ठ्यपूर्ण गुणांमुळे त्यांना बांबवडे बाजारपेठेत अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. कपड्यांमधील गुणवत्ता तसेच नव्या पिढीला आकर्षित करणारी वेगवेगळे ड्रेस मटेरीअल , वेगवेगळे ड्रेसेस हे इथल वैशिष्ठ्य ठरत आहे. वेगवेगळ्या मजल्याम्ध्ये विभागणी केलेले कपडे आणि ग्राहकांना मिळणारी इथली विनम्र सेवा हे खऱ्या अर्थाने स्वामी कलेक्शनच यश आहे.

निव्वळ एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या ब्रँडस चे कापड त्याचबरोबर तयार शर्टस ,पंत्स,कुर्ता ,जीन्स , माताभगीनीसाठी वेगवेगळ्या साड्या तर युवतींसाठी ड्रेस मटेरीअल सोबत वन पीस , टू -पीस ड्रेसेस इथं उपलब्ध आहेत. याचबरोबर ग्राहकांना देण्यात आलेली सेवा हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मालकांचे वैयक्तिक लक्ष आणि कर्मचारी वृंदाची निस्सीम सेवा हे देखील स्वामी कलेक्शन च वैशिष्ठ्य ठरतंय . याचबरोबर चौगुले बंधू व्यावसायासोबत सामाजिक बांधिलकी जोपसताना देखील पाहायला मिळत आहे . या मंडळीनी शाहुवाडी येथील अनाथ आश्रमामधील मंडळीना कपडे व भेटवस्तू देऊन सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासला आहे. तसेच गरीब माताभगीनिना आपल्या सामाजिक बांधिलकीतून भेटवस्तूंचा पुरवठा चौगुले बंधूनी केला आहे. हि मंडळी केवळ व्यवहारच पाळतात असे नव्हे तर समाजाशी जोडलेली नाळ आपल्याला पाहायला मिळत आहे. आयुष्यात केवळ पैसाच महत्वाचा नसतो तर त्यासोबत सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासणे तितकाच महत्वाच असत .

असं हे बंधू ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं स्वामी कलेक्शन नावाचं भव्य वस्त्र दालन यशस्वीरित्या सांभाळत आहेत. यावेळी बोलताना चौगुले बंधू म्हणाले कि,आमच्या असंख्य ग्राहकांना , पुरवठा दारांना तसेच आप्तेष्टांना व हितचिंतकांना स्वामी कलेक्शन च्या वतीने दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहे. दिवाळी सणाच्या अनुषंगाने ते एस.पी.एस. न्यूज शी बोलत होते . अशा या चौगुले बंधू व त्यांचा कर्मचारी वृंद यांना सा.शाहुवाडी टाईम्स व एस.पी.एस. न्यूज च्या वतीने दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा …

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!