रुग्णसेवेतून जपलीय सामाजिक बांधिलकी : यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

बांबवडे : यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्यावतीने तालुक्यातील सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत, त्या डॉ. अभिजित जानकर यांनी. तसेच माझ्या सर्व आप्तेष्टांना दीर्घायुरोग्य लाभो,अशी सदिच्छा व्यक्त केलीय ती, डॉ. अभिजित जानकर आणि परिवार यांनी. दीपावलीच्या सणाच्या अनुषंगाने ते एसपीएस न्यूज शी बोलत होते. डॉ. जानकर यांचं यशोदा हॉस्पिटल सर्व सामान्य जनतेसाठी सध्या तरी वरदान ठरंत आहे. गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत ‘ कोरोना ‘ ने सामान्य जनतेला रक्ताचे अश्रू गाळायला लावले. अशा परिस्थितीत अनेकांनी रुग्णांना आपल्या दवाखान्याचे दरवाजे बंद केले होते, त्यावेळी मात्र डॉ. जानकर यांचं ” यशोदा ” मात्र रुग्ण सेवेसाठी खंबीरपणे उभं राहिलं होतं. या काळात रुग्णांच्या नातेवाईकांकडून मिळालेले आशीर्वाद डॉ. जानकरांना आयुष्यभर पुरतील. कारण माणूस मृत्युच्या उंबरठ्यावर असताना, त्याला मिळालेलं सहकार्य निश्चितंच अनमोल असतं.

या दरम्यानंच त्यांनी महात्मा जोतीराव फुले आरोग्य योजना , केंद्राची पंतप्रधान आरोग्य योजना, या योजनांनी देखील डॉ.जानकरांच्या प्रयत्नांना लाख मोलाचं सहकार्य केलं. कारण कोरोना संक्रमण काळामुळे लोकांची आर्थिक घडी विस्कटली होती. अशावेळी पैशाची व्यवस्था करणे निश्चितच कठीण होतं. त्यामुळे या शासनाच्या योजनांनी सामान्य जनतेला दिलासा दिला. म्हणूनच डॉ. अभिजित जानकर यांचं ” यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ” कोणत्या न कोणत्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत पोहचलं आहे.

डॉ.जानकर व त्यांचं ‘ यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ‘ यांच्या सर्व कर्मचारी वृंदाला ” एसपीएस न्यूज ” च्या वतीने दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!