श्री नामदेव गिरी म्हणजे साहेबांच्या हक्काच्या वादळाचा एक अविभाज्य घटक:वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


बांबवडे : ” साहेब ” या व्यक्तिमत्वाच्या केवळ एका हाकेवर अवघं आयुष्य ओवाळून टाकणारी पिढी आजही अस्तित्वात आहे. हि पिढी म्हणजे साहेबांचं हक्काचं वावटळ म्हणावयास हरकत नाही . कारण साहेबांचा एक आदेश आणि दुसरीकडे तत्काळ परिणाम, असं चित्र काही वर्षापूर्वी पाहायला मिळायचं. या पिढी पैकी एक नाव आहे, श्री नामदेव गिरी. आणि साहेब म्हणजे समस्त शिवसैनिकांचं आराध्य दैवत
हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे.

Advt.


हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे. या नावावर नितांत भक्ती असलेल्या नामदेव गिरी यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने मनस्वी हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही पाहिलेल्यात्यांच्या आयुष्यातील घडामोडींवर एक प्रकाशझोत…

Advt.


नामदेव गिरी आणि त्यांचे थोरले बंधू सुखदेव गिरी हे दोन्ही बंधू अगदी लहानपणापासून कट्टर हिंदुत्ववादी. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत भक्ती असलेले हे दोन्ही बंधू. याचबरोबर या दोघांचे आपल्या आईवर नितांत प्रेम.

Advt.


एक काळ असा होता कि, या दोन्ही बंधूंनी अतिशय काबाडकष्ट केले. एकवेळ तर बांबवडे ते शित्तूर पायी प्रवास केलेला आम्ही पाहिला आहे. परंतु असीम कष्ट आणि जनसंपर्क यांच्या बळावर त्यांनी आपले आयुष्य बदलले. आज त्यांचा उद्योग समूह झळकू लागला आहे. या सर्व काळात त्यांनी मात्र शिवसेना कधीही सोडली नाही . स्व. साहेबांनी दिलेल्या एका हाकेवर जीव ओवाळून टाकणाऱ्या शिवसेनेच्या एका कट्टर टीम पैकी हे दोन्ही बंधू आहेत. काळाच्या ओघात साहेब पडद्याआड गेले, पण यांची त्यांच्यावर असलेली भक्ती आजही कायम आहे.

Advt


त्यांच्या असीम भक्तीची परतफेड म्हणून, पक्षाने त्यांना उपजिल्हाप्रमुख हे पद दिलं आहे. हे निश्चित सार्थकी लागलं आहे. नामदेव यांना आम्ही लहानपणापासून पहात आलो आहोत. समाजसेवा या व्यक्तीच्या अंगात जन्मतःच भिनलेली आहे. कितीही कष्ट आले तरी, समाजाची बांधिलकी हि व्यक्ती आजही जपून आहे. अशा या साहेबांच्या भक्ताला मनापासून शुभेच्छा. त्यांना दीर्घायुरोग्य लाभो ईश्वर चरणी प्रार्थना.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!