स्वाभिमानी च्या वतीने ” भारत बंद ” ला पाठींबा


बांबवडे : उद्या ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या शेतकऱ्यांच्या देशव्यापी ” भारत बंद ” ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने ८ डिसेंबर च्या ” भारत बंद ” ला सहकार्य करावे.
या ‘ भारत बंद ‘ ला पाठींबा देण्यासाठी शाहुवाडी तालुक्यातील शेतकरी , व्यापारी तसेच तमाम तालुका वासियांनी बंद पाळून शेतकरी विरोधी असलेल्या विधेयकाला विरोध दर्शवावा, असे आवाहन शाहुवाडी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी स्वाभिमानी संघटनेच्यावतीने बांबवडे व्यापारी वेल्फेअर असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला, आणि बंद ला पाठींबा देण्याचे आवाहन केले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब खुटाळे, उपाध्यक्ष दत्तात्रय शेळके, दत्तात्रय यादव, शरद बाऊचकर, आनंदा प्रभावळे, सतीश काशीद आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्वाभिमानी संघटनेचे सुरेश म्हाऊटकर, पद्मसिंह पाटील, जयसिंग पाटील, अवधूत जानकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!