शेतकरी संघर्ष समन्वय समिती शाहुवाडी चे धरणे आंदोलन


बांबवडे : शेतकरी संघर्ष समन्वय समिती शाहुवाडी च्यावतीने शाहुवाडी इथं धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र शासनाने शेतकरी अन्याय विरोधक केलेले कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली इथं शेतकरी संघटनेने आंदोलन केले आहे. त्या आंदोलनास पाठींबा दर्शविण्यास शेतकरी संघर्ष समन्वय समिती शाहुवाडी ,यांनी तहसीलदार कार्यालय शाहुवाडी इथं आज दि.१४/१२/२०२० रोजी धरणे आंदोलन केले. यावेळी शेतकरी विरोधी कायदे रद्द करा. तसेच लॉकडाऊन काळात आलेली वीज बिले माफ करा, आदी मागण्या मांडण्यात आल्या.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे भाई भारत पाटील, राजेंद्र गोविंद देशमाने, शिवसेनेचे दत्ता पोवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!