आबालवृद्ध आणि तरुणांचं डोळ्यांसाठी विश्वसनीय ठिकाण ” यशराज ऑप्टीकल्स “


बांबवडे : दृष्टिकोनाबरोबरच दृष्टी चे संरक्षण करणे, हेच खूप महत्वाचे असते. दृष्टी सांभाळण्यासाठी सर्वोतोपरी खबरदारी घेणारे, बांबवडे येथील ‘ यशराज ऑप्टीकल्स ‘ हे आपली खासियत सांभाळून आहे. केवळ डोळे तपासणे, आणि चष्मे विकणे, केवळ हा उद्देश न ठेवता, डोळ्यांबरोबरच ग्राहकांची दृष्टी जपणे, हा सुद्धा उद्देश ‘ यशराज ऑप्टीकल्स ‘ सांभाळत असल्याचे, कदमबांडे बंधूंनी ‘ एसपीएस न्यूज ‘ शी बोलताना सांगितले.


बांबवडे तालुका शाहुवाडी इथं, गेल्या अकरा वर्षांपासून ग्राहकांच्या डोळ्यांची सातत्याने काळजी घेण्याचे काम, ‘ यशराज ‘ करीत आहे. लोकांच्या डोळ्यांची काळजी घेणे, याचबरोबर ग्राहकांना आधुनिक फॅशन च्या फ्रेम्स उपलब्ध करून देण्यात ‘ यशराज ‘ यशस्वी झालं आहे.


केवळ व्यवहार नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपण्यात सुद्धा, कदमबांडे बंधूंनी आपले कर्तव्य जपले आहे. आधुनिक जापनीस मेड च्या मशीनद्वारे इथं डोळ्यांची तपासणी केली जाते. माफक दरात चष्म्यांच्या फ्रेम्स उपलब्ध केल्या जातात. जेष्ठ नागरिक, आणि लहान मुलांना इथं विशेष आदराची सुविधा दिली जाते. त्याचबरोबर तरुण मंडळींसाठी वेगवेगळ्या फॅशन्सच्या फ्रेम्स उपलब्ध केल्या जातात. केवळ चष्मे नव्हे तर गॉगल्स ची सुद्धा इथं विक्री केली जाते. नामवंत कंपन्यांचे ब्रँडेड गॉगल्स सुद्धा इथं माफक दरात मिळतात.
म्हणूनच ” यशराज ऑप्टीकल्स ” काही कालावधीतच नावारूपाला आलं आहे. आबालवृद्ध आणि तरुण, तरूणींचं डोळ्यांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे ओंकार व मयूर कदमबांडे बंधूंचं ” यशराज ऑप्टीकल्स ” .

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!