सह्याद्रीच्या कुशीतील तुर्रेबाज फेटा : जनार्दन गायकवाड उर्फ ” दाजी “


बांबवडे : सह्याद्रीच्या मातीला कल्लेदार मिशा आणि तुर्रेबाज फेटा , हि संस्कृती लाभलेली आहे, त्याचबरोबर काही काळ ती प्रचलित होती. काळाच्या ओघात कल्लेदार मिशा विरत चालल्या, पण तुर्रेबाज फेटा मात्र आजही कोल्हापूर च्या मातीची संस्कृती दर्शवित आहे.
कोल्हापुरात बहुतांश मंडळींना फेटा बांधता येतो, पण तुर्रेबाज फेटा मात्र काही मोजक्याच मंडळींना बांधता येतो. अशा मंडळींमध्ये बांबवडे चे ” दाजी ” यांचा विशेष उल्लेख करावा लागतो. सलग दोन फेटे वेगवेगळे घेवून ते एकत्रित बांधण्यात, दाजींचा कोणी हात धरू शकत नाहीत. त्यांनी बांधलेला फेटा सोडतो, म्हटलो, तरी लवकर सुटणार नाही. आत्ता दाजी म्हणजे कोण म्हणाल तर ते आहेत, ” जनार्दन मारुती गायकवाड “. हे व्यक्तिमत्व आपलं सह्याद्रीच्या कुशीतील कसब खऱ्या अर्थानं लोकांसमोर ठेवत आहेत. अनेक लग्नसमारंभात दाजींचा तुर्रेबाज फेटा डौलाने मिरवत असतो. दाजी म्हणजे आपल्या बांबवडे गावचे ” शामू नाना ” यांचे जावई होत. आणि शामू नाना म्हणजे अवघ्या बांबवडे गावाला परिचित असलेलं व्यक्तिमत्व म्हणावयास हरकत नाही.


जनार्दन गायकवाड उर्फ दाजी यांचं मूळ गाव ” निवडे “. तिथं ते सतत तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून यशस्वी कार्यकाल उपभोगलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यात ते दोन वर्षे सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. हे जरी खरं असलं, तरी दाजींच्या फेटा बांधणीच्या कसब ला सलाम करावा, तितका थोडा आहे. केवळ एक फेटा बांधणं ठिक आहे, दोन फेट्यांचं मिश्रण करून दुरंगी फेटा बांधणं , हे निश्चितच कौतुकास्पद आहे. छत्रपतींच्या काळात अशा पद्धतींचे फेटे स्वाभिमानाने लहरत असायचे. त्यातल्यात्यात कोल्हापुरी फेटा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राची शान. हि शान आजही दाजींच्या बांधणीच्या रूपाने आपल्याला दिसून येतेयं. केवळ एवढेच नव्हे तर दाजींनी घातलेली विन ,कोणा महिलेला घालणं सुद्धा कठीण होईल. चाबकाच्या टोकाला पूर्वी शेतकरी विन घालायचा, ते आपल्याला दाजींच्या कडे असणाऱ्या खुबीतून लक्षात येईल. कोल्हापूरच्या मातीत अशी मंडळी होती, म्हणूनच ” राजे ” स्वराज्य निर्माण करू शकले.


परंतु सध्या काळ बदलत चालला आहे. आपल्याकडे असलेल्या कला गुणांना प्रदर्शित करून, अर्थार्जन केल्यास वावगे ठरू नये. तेंव्हा लग्न , किंवा इतर कोणत्याही समारंभात आपल्याला जर तुर्रेबाज फेटा बांधून हवा असेल, तर आमच्या दाजींशी संपर्क साधा. बांबवडे येथील नारकर बिल्डींग मध्ये त्यांचे दुकान आहे. केवळ फेटेवाले दाजी म्हणालात तरीही, आपला लगेच संपर्क होईल.

स्वामी कलेक्शन


दाजींना आमच्या सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे अभिनंदन सुद्धा.

6+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!