उद्या दि.२७ डिसेंबर रोजी आमदार कोरेंचा बांबवडे इथं मेळावा


बांबवडे : दि. २७ डिसेंबर रोजी बांबवडे तालुका शाहुवाडी इथं आमदार विनय कोरे (सावकर) यांचा मार्गदर्शन मेळावा संपन्न होणार आहे. अशी माहिती जनसुराज्य चे बांबवडे विभागाचे संपर्कप्रमुख प्रकाश व्हनागडे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

Advt.


बांबवडे इथं होणाऱ्या मार्गदर्शन मेळाव्यात बाजारसमिती कोल्हापूर चे अशासकीय सदस्य कर्णसिंह गायकवाड देखील उपस्थित राहणार आहेत. तेंव्हा तालुक्यातील जनतेने आपली काही तक्रार असल्यास यावेळी उपस्थित रहावे. मेळाव्यानंतर आमदार जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न करतील. यावेळी कर्णसिंह गायकवाड यांच्यासहित अनेक नेते मार्गदर्शन करतील. तेंव्हा जनतेने या मेळाव्यास उपस्थिती दर्शवावी , असे आवाहन करण्यात आले आहे.

Advt.


हा मेळावा बांबवडे येथील बाजारसमिती चे बाबा लाड यांच्या शेड वर दु.१.०० वाजता संपन्न होणार आहे, अशी माहिती देखील प्रकाश व्हनागडे यांनी दिली.

4+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!