शाहुवाडी तालुका पत्रकारसंघाच्या अध्यक्ष पदी मुकुंदराव पवार तर उपाध्यक्ष पदी संतोष कुंभार


बांबवडे : शाहुवाडी तालुका पत्रकार संघ शाहुवाडी ,या पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी श्री मुकुंदराव पवार तर उपाध्यक्ष पदी संतोष कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


शाहुवाडी तालुका पत्रकार संघाची बैठक नुकतीच संपन्न झाली. पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष आनंदराव केसरे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी संपन्न झाल्या.


यावेळी कार्याध्यक्ष पदी पुनश्च आनंदराव केसरे, तर सचिव म्हणून रमेश डोंगरे, व खजानीस म्हणून श्रीमंत लष्कर यांची निवड करण्यात आली.


यावेळी डॉ. डी.आर, पाटील, शाम पाटील, चंद्रकांत मुदुगडे , सुभाषराव बोरगे, डॉ.चंद्रकांत शेळके, आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
या दरम्यान तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र पाटील यांनी कोल्हापूर ची शान असलेल्या रंकाळा तलाव परिसरावर भाष्य करणारे पुस्तक लिहिले आहे. याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सुभाष बोरगे यांनी सुचवला, व सर्वानुमते त्यास अनुमोदन देण्यात आले.


या बैठकीला संजय पाटील, मारुती फाळके, केशव डिगे, एस.डी. वारंग, वसंत पाटील, राजाराम कांबळे,संजय जगताप, सुखदेव पाटील, संजय पोवार, माधव कळंत्रे, दशरथ खुटाळे, हनुमंत जाधव, आनंदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

2+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!