स्मार्ट फोन खरेदी वर सौं. साठी आकर्षक पैठणी सुद्धा : फ्रेंड्स मोबाईल शॉपी


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे इथं एका तरुणाने कष्टाने सुरु केलेला व्यवसाय नावारूपाला येवू लागला आहे. एका मोबाईल रिचार्ज पासून सुरु केलेला व्यवसाय, आत्ता अनेक कंपन्यांचे स्मार्ट मोबाईल फोन विक्री करण्या इतपत तरुणाने केलेली प्रगती, खरंच वाखाणण्यासारखी आहे. फ्रेंड्स मोबाईल शॉपी बांबवडे, इथं खरेदी केलेल्या फोनवर सौं. साठी आकर्षक भेट म्हणून ” पैठणी ” भेट देण्याचे ठरवले आहे. अशा कष्टाळू तरुणाचे नाव आहे, अमोल कुमार लाटकर, फ्रेंड्स मोबाईल शॉपी चे मालक.


एकेकाळी सकाळी वर्तमान पत्र वाटप करणारा हा मुलगा, परिस्थितीच्या माऱ्यापासून खूप काही शिकला. अनेक अपमानाचे घोट पचवत, आयुष्याशी लढत होता. परंतु या लढाई तून सकारात्मक उर्जा घेवून , त्याने सुरुवातील मोबाईल रिचार्ज सुरु केले. काही काळानंतर खऱ्या अर्थाने या व्यवसायाची नाळ त्याने ओळखली. सुरुवातीला काही स्मार्ट मोबाईल फोन विक्री ला ठेवले. परंतु सध्या प्रगती ची आणखी एक पायरी या तरुणाने चढली आहे.

सर्वसामान्य वर्गाचे आर्थिक दु:ख काय असते, हे त्याने जाणले, आणि यासाठी आर्थिक पत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधला, आणि कंपन्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. मोबाईल खरेदीसाठी आर्थिक कमतरता , आपल्या स्वप्नांच्या आड येवू नये, म्हणून बजाज फायनान्स कंपनी फायनान्स करायला तयार झाली. आणि ग्राहकांचा सगळ्यात महत्वाचा पैशाचा प्रश्न आपोआप सुटला. याचबरोबर सॅमसंग फायनान्स, टीव्हीएस क्रेडीट आदी कंपन्यांच्या कडून सुद्धा फायनान्स उपलब्ध करून देण्यात येत आहे.
याचबरोबर आपला जुना स्मार्ट फोन तुम्ही एक्स्चेंज करू शकता, जुन्या फोन च्या बदल्यात नवा स्मार्ट फोन नेवू शकता. अस आहे आपलं हक्काचं दुकान ते म्हणजे फ्रेंड्स मोबाईल शॉपी.
सध्या या फ्रेंड्स मोबाईल शॉपी मध्ये विवो, ओप्पो, रेडमी, अॅप्पल, सॅमसंग आदी नामांकित कंपन्यांचे फोन इथं सुलभ हफ्त्यांवर उपलब्ध आहेत. याचबरोबर फोन च्या खरेदीवर १० टक्क्यांपासून ४० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट देण्यात येत आहे. याचबरोबर श्रींसाठी घेतलेल्या स्मार्ट मोबाईल फोन बरोबर सौं.साठी सुद्धा पैठणी भेट म्हणून देण्यात येणार आहे. असेही फ्रेंड्स मोबाईल शॉपी चे मालक अमोल लाटकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!