पत्रकार हे आमचे प्रेरणास्थान : श्री रणवीरसिंग गायकवाड


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील पत्रकार माझे प्रेरणास्थान असून, मला नेहमीच त्यांच्या सहवासातून उर्जा मिळते. कोणत्याही अपयशाला घाबरणारे आम्ही नसून, लढणे, हे आमच्या रक्तातच आहे. आपल्या पत्रकारांच्या सूचनांमधून रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती, हि सेवाभावी संस्था उभी राहिली आहे. तेंव्हा पत्रकार दिनाचे औचित्य साधून मला मनमोकळ्या गप्पा करता आल्या, हेच आमचे भाग्य आहे, असे भावनोत्कट उद्गार उदय साखर चे संचालक व रणवीरसिंग गायकवाड युवा शक्तीचे संस्थापक रणवीरसिंग गायकवाड यांनी काढले.


शाहुवाडी तालुक्यातील पत्रकारांचा गौरव पत्रकार दिनादिवशी होत असतो. त्याचे औचित्य साधून पत्रकार दिनानंतर येणाऱ्या रविवारी रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती च्या वतीने पत्रकारांचा गौरव सोहळा प्रत्येक वर्षी संपन्न होतो. त्याचं अनुषंगाने हा पत्रकार गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून रणवीरसिंग गायकवाड बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे नव्या कार्यकारिणीचे अध्यक्ष मुकुंद पवार, तर कार्याध्यक्ष आनंदराव केसरे उपस्थित होते. यावेळी दैनिक सकाळ चे पत्रकार डॉ. डी.आर. पाटील यांचा विशेष सत्कार त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल करण्यात आला. तसेच यावेळी रणवीर सिंग गायकवाड युवा शक्तीच्या अध्यक्ष पदी समीर पाटील यांची नव्याने निवड झाल्याबद्दल त्यांचादेखील सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी डॉ. डी. आर. पाटील यांनी स्व. खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्याबाबत असलेल्या दुर्मिळ माहितीला उजाळा दिला. तसेच गायकवाड घराण्याविषयी असलेला आदर आपल्या मनोगतातून व्यक्त केला.


यावेळी कार्याध्यक्ष आनंदराव केसरे म्हणाले कि, जुन्या अपयशाला तिलांजली देवून नव्या जोमाने युवा नेत्यांनी उभे राहणे,हि काळाची गरज आहे, असे सांगितले.
तसेच नूतन कार्यकारिणीचे अध्यक्ष मुकुंदराव पवार यांनी आपल्या सोबत असलेल्या पत्रकारांमध्ये डॉक्टरेट मिळवलेले पत्रकार असल्याचा अभिमान व्यक्त केला. त्याचबरोबर गायकवाड घराण्याने पुन्हा ताकदीने उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सोबत असलेल्या सर्वच पत्रकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


यावेळी मारुती फाळके, सुभाषराव बोरगे आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
या कार्यक्रमात सर्वच पत्रकारांचा रणवीरसिंग गायकवाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन रणवीरसिंग गायकवाड युवा शक्तीच्या वतीने करण्यात आले होते.


यावेळी पत्रकार सर्वश्री संजय पाटील, इस्माईल महात, अनिल पाटील, दशरथ खुटाळे, संजय जगताप, शैलेश चोरगे, संजय माने, आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश डोंगरे यांनी केले.
रणवीर सिंग गायकवाड युवा शक्ती चे माजी अध्यक्ष संग्रामसिंह खराडे, संदीप पाटील, शरद निकम, सुरज बंडगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार रणवीर युवा शक्ती चे नूतन अध्यक्ष समीर पाटील सावे, यांनी मानले.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!