सेवाभाव हा रयत संस्थेचा मुलभाव: प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, प्रा. एन.डी. महाविद्यालय


मलकापूर प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्था, हि सेवाभाव हा मूलाधार धरून वाढलेली संस्था आहे. म्हणूनच कोरोना सारख्या महामारी च्या संकटात जेंव्हा प्रा.एन.डी. पाटील महाविद्यालय ची इमारत कोरोना सेंटर साठी देण्यात आली. तेंव्हा सर्व शिक्षकवृंदासह शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा, आपल्या जीवाची पर्वा न करता राबले. कारण ह्या महामारीपासून अनेकांचे जीव वाचले जावेत, हा शुद्ध विचार त्यामागे होता. त्या काळात पत्रकारांचे देखील मोठे योगदान लाभले. या सर्वच गोष्टींना अनुसरून आज हा पत्रकार गौरव सोहळा आम्ही आयोजित केला आहे. असे मत प्रा.डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी व्यक्त केले.


ग.रा. वारंगे ज्युनिअर कॉलेज मलकापूर इथं पत्रकारदिनानिमित्त पत्रकारांचा गौरव सोहळा महाविद्यालयाच्या वतीने संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य. डॉ. सुनील हेळकर बोलत होते. यावेळी सर्व पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.एस.के. खोत यांनी केले.


यावेळी प्रा. डॉ.हेळकर पुढे म्हणाले कि, आमचे महाविद्यालय ” नॅक ” मानांकनाच्या तयारीत होते. जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली होती. अशावेळी हे वैश्विक संकट आपल्यावर आले. आणि शासनाने आमच्याकडे कोविड सेंटर साठी महाविद्यालयाची इमारत मागितली. आम्ही देखील सर्व कारणे बाजूला सारून लगेच इमारत प्रशासनाच्या हवाली केली. एवढेच नव्हे तर जमेल तशी सेवा येथील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिली.


प्रतिवर्षी आम्ही पत्रकारांचा यथोचित सन्मान पत्रकार दिनानिमित्त करीत असतो. कारण पत्रकार ह घटक समाजासाठी अहोरात्र झटत असतो. अशा घटकाचा सन्मान होणे, गरजेचे आहे, याच अनुषंगाने इमारत उभी राहिल्यापासून हा सोहळा अखंडितपणे होत आहे. असेही प्राचार्य डॉ.हेळकर यांनी सांगितले.


यावेळी उपप्राचार्य डॉ. एस.जी. माने यांनी देखील पत्रकारांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.


यावेळी शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मुकुंदराव पवार सत्काराला उत्तर देताना म्हणाले कि, कर्मवीर आण्णांनी घालून दिलेला सेवाभाव हा ‘ धर्म ‘ हे महाविद्यालय आजतागायत जपत आले आहे. दरम्यान कोरोना सारख्या महामारीत सुद्धा येथील शिक्षकवृंद व कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता राबले, याबाबत खऱ्या अर्थाने आम्ही पत्रकार मनापासून त्यांचे आभार मानतो व त्यांचे अभिनंदन करतो.


यावेळी लालासाहेब जगताप, सुभाषराव बोरगे, संघाचे उपाध्यक्ष संतोष कुंभार, सचिव रमेश डोंगरे यांनी मनोगते व्यक्त केलीत.


कार्यक्रमास पत्रकार सुखदेव पाटील, पंगत चौगुले, डॉ. चंद्रकांत शेळके, राजाराम कांबळे, सामाजिक कार्यकर्ते विकास कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी प्राध्यापक डॉ. एस.बी.सुतार, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉ. नामदेव आडनाईक यांनी मानले.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!