शाहुवाडी तालुक्यात लसीकरणास प्रारंभ


शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यात पहिल्या कोरोना लसीकरण केंद्राचा शुभारंभ मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात अंगणवाडी सेविकांना लस देवून करण्यात आला.
गेले नऊ ते दहा महिने सर्वत्रच एका भीषण महामारीने सर्वांना ग्रासले होते. कोरोना च्या भीषण संकटात सर्वांनाच आधार देणारी व प्रतिबंधक लस आल्याने सर्वांनाच आधार मिळाला आहे. ग्रामीण रुग्णालयात या लसीचा शुभारंभ जिल्हापरिषद चे आरोग्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक व जि.प.सदस्य सर्जेराव पाटील पेरीडकर, विजयराव बोरगे, पंचायत समिती सदस्य अमरसिंह खोत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच.आर. निरंकारी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सौ. एस.बी. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ संपन्न झाला.


याबाबत अधिक माहिती देताना, डॉ. निरंकारी व डॉ गायकवाड म्हणाल्या कि , लसीकरणाचा हा पहिला टप्पा असून, यामध्ये आरोग्य विभाग , शासकीय अधिकारी, खाजगी अधिकारी, कर्मचारी त्याचबरोबर अंगणवाडी चे अधिकारी, सेविका, कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे.


इथं लसीकरणासाठी वेगळा कक्ष तयार करण्यात आला असून, कोव्हीन अॅप द्वारे त्याची नोंदणी करण्यात येत आहे. दररोज १०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. नोंदणी संदर्भाने ओळखीसाठी आधार कार्ड अथवा पॅन कार्ड आवश्यक आहे.


दरम्यान लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलीस यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, सफाई कर्मचारी, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व सैनिक यांना लसीकरण करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात पन्नास वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. चौथ्या टप्प्यात ३० ते ५० वर्षांखालील व्याधीग्रस्त नागरिकांना लसीकरण करण्यात येईल.


याप्रसंगी मलकापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, नगरसेवक रमेश चांदणे, नगरसेविका सोनिया शेंडे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आशुतोष तराळ, डॉ.दिलजित, श्रीमती रणवरे, श्री गायकवाड, चव्हाण, येळाणे ग्रामपंचायत सदस्य रोहित जांभळे, यांच्यासह रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!