बांबवडे आरोग्यवर्धिनी केंद्रास रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कोल्हापूर जिल्हापरिषदेचे आरोग्य सभापती हंबीरराव पाटील , रणवीरसिंग गायकवाड व जिल्हा परिषद सदस्य विजयराव बोरगे पैलवान यांच्या हस्ते संपन्न झाला.


बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्र हे सुमारे ३० ते ४० गावांच्या संपर्काशी जोडलेले केंद्र आहे. तसेच हे आरोग्य केंद्र बांबवडे सारख्या मुख्य बाजारपेठेत आहे. त्यामुळे येथील जनतेला या अद्ययावत रुग्णवाहिकेची गरज होती. १४ व्या वित्त आयोगातून या रुग्णवाहिकेची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.


त्याचबरोबर क्षयरोग निदान, फुफुसाचे आजार यांचे निदान करण्यासाठी दोन अतिरिक्त रुग्णवाहिका सहा दिवसांसाठी तालुक्यातून फिरणार असून, संशयित रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य सभापती हंबीरराव पाटील , तसेच जि.प.सदस्य विजयराव बोरगे यांनी केले आहे.


या लोकार्पण सोहळ्यास उदय साखर चे संचालक रणवीरसिंग गायकवाड, शाहुवाडी पंचायत समिती च्या सभापती सौ सुनिता पारळे, उपसभापती विजयराव खोत, सुरेश पारळे, बांबवडे ग्रामपंचायत चे उपसरपंच सयाजी निकम, सदस्य सुरेश नारकर, विष्णू यादव, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष बाळासाहेब खुटाळे, शरद बाउचकर, चंद्रप्रकाश पाटील, व ग्रामस्थ उपस्थित होते.


यावेळी सीपीआर रुग्णालयातून डॉ. उषादेवी कुंभार जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. मानसी कदम, टेक्निशियन चंद्राप्पा आपटे, सुभाष पाटोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एच.आर. निरंकारी, डॉ. दिपाली जद, डॉ. रवींद्र कांबळे, सीपीआर चे जिल्हा समन्वयक एकनाथ पाटील, सुभाष यादव, डी. ए. लोहार, के.बी. मोहिते, आशा , आरोग्यसाहायिका, व ग्रामस्थ मोठ्या संख्येवर उपस्थित होते.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!