शाहुवाडी तालुक्यातील १०६ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर


शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील १०६ ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडती शाहुवाडी पंचायत समिती च्या सभागृहात तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. या सोडती लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आल्या.

यावेळी गटविकास अधिकारी अनिलकुमार वाघमारे, बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, शाहुवाडी पंचायत समिती च्या सभापती सौ सुनिता पारळे, उपसभापती विजयराव खोत, रमेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.


खालील प्रमाणे आरक्षण पडलेल्या ग्रामपंचायतींची नावे :
सर्वसाधारण पुरुष : विरळे, साळशी, भाडळे, तुरुकवाडी, परखंदळे, खुटाळवाडी, कोतोली, कातळेवाडी, येळवण जुगाई, खोतवाडी, माळापुडे, मांजरे, गजापूर, चनवाड, मोसम, थावडे, मोळावडे, जांबूर- मालगाव, मानोली, कापशी, पिशवी, कोपार्डे, आल्तूर, भेंडवडे, सोनवडे, वरेवाडी, गोंडोली, गोगवे, अनुस्कुरा, सवते. शिराळे तर्फ मलकापूर, माण.
सर्व साधारण स्त्री : करंजफेण, आरूळ, पुसार्ले, गिरगाव, माणगाव, परळे, गावडी, सावर्डे खुर्द, वडगाव, भेडसगाव, रेठरे, चरण, सुपात्रे, नेर्ले, आकुर्ळे, केर्ले, वालूर, शिवारे, कासार्डे, पाटणे, परळी, शिराळे तर्फ वारुण, कडवे, लोळाणे, पेरीड, आंबा, ससेगाव, वाडीचरण, उचत, हारुगडेवाडी, बजागेवाडी.


नागरिकांचा मागास प्रवर्ग : कुंभवडे, बांबवडे, पेंडाखळे, सांबू, शिंपे, मालेवाडी, बुरंबाळ, सरूड, अमेणी, करूंगळे, ओकोली, कांडवण, शित्तूर तर्फ मलकापूर, ऐनवाडी, येलूर.
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री : कोळगाव, मरळे, गेळवडे, चांदोली, डोणोली, टेकोली, सावे, नांदगाव, उखळू, सोंडोली, शित्तूर तर्फ वारुण, वारूळ, कातळेवाडी, बहिरेवाडी.


अनुसूचित जाती पुरुष : उदगिरी, थेरगाव, सोनुर्ले, पनुंद्रे, सावर्डे बु., शेंबवणे.
अनुसूचित जाती स्त्री : परळे निनाई, आंबर्डे, करंजोशी, निळे, खेडे, नांदारी, घुंगुर.
अनुसूचित जमाती : येळाणे.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!