फरार आरोपींना काही तासातच अटक : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभिनंदन


शाहुवाडी प्रतिनिधी : आरोपींना कोर्टात घेवून जात असतानाच, संबंधित आरोपींनी पोलिसांना चकवा देवून धूम ठोकली होती. परंतु सदरच्या आरोपींना पोलिसांनी काही तासांतच आरोपींना पुन्हा अटक केली.
शाहुवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहुवाडी पोलीस ठाण्यात अटक असलेले आरोपी बैथूल शेख व आलम शब्बीर शेख या दोन आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना, ठेच लागल्याचे निमित्त करून आरोपी बैथूल शेख याने पडण्याचे नाटक करून बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात फरशी घालून पोबारा केला. त्याच्या बरोबर असलेल्या दुसऱ्या आरोपीने सुद्धा धूम ठोकली.
दरम्यान पोलीस उपाधीक्षक आर.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सत्तर ते ऐंशी पोलीस कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांच्या साथीने आरोपींना जेरबंद केले. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल उपाधीक्षक आर.आर.पाटील यांनी शाहुवाडी पोलिसांचे अभिनंदन केले. सदर आरोपींना वैद्यकीय तपासणी करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

5+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!