लसीकरणास भरघोस प्रतिसाद मिळेल – जि.प.स. विजयराव बोरगे


बांबवडे : कोरोना च्या पहिल्या लाटेत अवघा महाराष्ट्र भरडला होता. परंतु त्यानंतर लस उपलब्ध झाली. आणि अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. लस उपलब्ध झाल्यानंतर शाहुवाडी तालुक्यात १४०० च्या वर नागरिकांनी लस घेतली आणि, कोरोना ला दारातच अडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.


शाहुवाडी तालुक्यात आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर्स मिळून ९६४ जणांना लसीकरण करण्यात आले. याबरोबर फ्रंट लाईन वर्कर्स ४०१, यामध्ये पोलीस, शिक्षक, ग्रामसेवक यांनी लाभ घेतला.


यानंतर ६० वर्षांवरील ३ जणांनी लाभ घेतला.


तर आज दि.४ मार्च पासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांचा लसीकरण चा टप्पा सुरु झाला आहे. यालादेखील भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा जि.प. सदस्य विजयराव बोरगे यांनी व्यक्त केली.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!