पिशवी मतदारसंघातील ” हिरकणीं ” ना अनोखी भेट : जि.प.स. विजयराव बोरगे


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील पिशवी मतदारसंघातील ” हिरकणीं ” ना येथील जिल्हापरिषद सदस्य विजयराव बोरगे यांनी ‘ हिरकणी ठेव योजने ‘ च्या माध्यमातून ‘ महिला दिन ‘ चे औचित्य साधून, अनोखी भेट दिली आहे. शासनाची ” बेटी बचाव, बेटी पढाओ ” या धोरणाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे.


हि योजना ८ मार्च ते ८ जून २०२१ पर्यंत मर्यादित राहील. त्यामुळे आजपासून ज्यांच्या घरी मुलगी जन्मास येईल, त्या मुलीच्या नावावर २००० रुपयांची हिरकणी ठेव पावती करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य विजयराव बोरगे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.


ते पुढे म्हणाले कि, आजही समाजात मुलींच्या जन्माविषयी तितकीशी जागरुकता नाही. आजही सुशिक्षित मंडळी सुद्धा मुली च्या जन्मासंदर्भाने अनुत्साही असल्याचे जाणवले आहे. परंतु आज महिला आदिशक्ती च्या स्वरुपात आकाशाला गवसणी घालत आहेत. असे असतानाही, समाज मानसिकदृष्ट्या मागासलेला राहता कामा नये. यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे.


आमच्या पिशवी मतदारसंघात सुद्धा अनेक भगिनी उच्च स्तरावर आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत. कोण पोलीस खात्यात आहे, तर कोणी गिर्यारोहक बनून आकाशाला गवसणी घातली आहे. अशा सर्वच माता- भगिनींना आजच्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. त्यांनी त्यांच्या कर्तुत्वाने ‘ हिरकणी ‘ बनून समाजाला नवा आदर्श घालून द्यावा, असेही विजयराव बोरगे यांनी सांगितले. हि योजना फक्त तीन महिन्यांसाठी असून, फक्त पिशवी जि.प. मतदारसंघापुरती मर्यादित आहे.


ज्यांच्या घरी मुलगी जन्माला आली असेल, त्यांनी मुलीचा जन्म दाखला घेवून तानाजी पाटील व हर्षवर्धन पाटील यांच्याशी ९४०४११५२८१, व ९८५०२९९००० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ही श्री बोरगे यांनी केले आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!