संजय गांधी निराधार समिती च्या सदस्य पदी नामदेव गिरी यांची नियुक्ती


बांबवडे : शाहुवाडी तालुका संजय गांधी निराधार समिती च्या सदस्य पदी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव शामराव गिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल शाहुवाडी तालुक्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने श्री नामदेव गिरी यांचे हार्दिक अभिनंदन.
नामदेव गिरी हे शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत आहेत. म्हणूनच सेनेचे मा. आमदार सत्यजित पाटील सरुडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या सूचनेनुसार, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हि नियुक्ती करण्यात आली आहे. तशा आशयाचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!