शित्तूर तर्फ वारुण च्या श्री दगडू झेंडे गुरुजींची संजय गांधी निराधार समिती च्या सदस्य पदी वर्णी


शित्तूर तर्फ वारुण : शित्तूर तर्फ वारुण तालुका शाहुवाडी येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक श्री दगडू बाबू झेंडे यांची संजय गांधी निराधार समिती शाहुवाडी तालुक्याच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. निवृत्त शिक्षक झेंडे यांच्या या नियुक्तीमुळे त्यांचे परिसरातून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने झेंडे गुरुजींचे हार्दिक अभिनंदन.
श्री दगडू झेंडे हे शेकाप चे जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे भाई भारत पाटील वडगावकर यांनी झेंडे गुरुजींचे नाव सुचविले आहे. त्यांच्या सूचनेवरून पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी नाव सुचविले आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हि नियुक्ती करण्यात आली आहे.
गावात दोन पदे आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यामुळे झेंडे गुरुजींचे अभिनंदन करण्यात येत आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!