सामाजिक

स्व.अशोकराव घोडे-पाटील(भाऊ) यांच्या जयंतीनिमित्त उद्या रक्तदान शिबीर


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील घोडे-पाटील कॉम्प्लेक्स मध्ये दि. २३ मार्च २०२१ रोजी स्व. अशोकराव घोडे-पाटील यांच्या जयंती चे औचित्य साधून ” फायटर ग्रुप ” च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या रक्तदान शिबिरासाठी संजीवन ब्लड बँकेच्या वतीने डॉ.प्रीती राजपूत येणार आहेत.
स्व.अशोकराव घोडे-पाटील एक सर्वमान्य व्यक्तिमत्व होते. बांबवडे पंचक्रोशीत त्यांचा दबदबा होता. अशोकभाऊ म्हणजे सर्व सामान्य माणसांचा एक जिव्हाळ्याचा आधार होते. कोणाला कोणतीही अडचण असू दे, अशोकभाऊ प्रत्येकाच्या अडी-अडचणीला उभे राहायचे. असे हे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्या आड गेल्याने या पंचक्रोशी ची खूप मोठी हानी झाली आहे.
अशा या व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्त हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून, तरुणांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग दर्शवावा,असे आवाहन फायटर ग्रुप च्या वतीने स्वप्नील घोडे-पाटील यांनी केले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!