बांबवडे इथं उद्या दि. २४ मार्च २०२१ रोजी श्री दत्त चिले सह. पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील शामराव शेळके कॉम्प्लेक्स मध्ये उद्या दि. २४ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता श्री दत्त चिले सह. पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
बांबवडे इथं श्री दत्त चिले सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचा उद्घाटन सोहळा श्री क्षेत्र ३२ शिराळा जि.सांगली च्या गोरक्षनाथ मठाचे, मठाधिपती पीरयोगी पारसनाथ स्वामी यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था शाहुवाडी श्री सुजय बी. येजरे असणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाहुवाडी तालुका गटविकास अधिकारी श्री अनिल वाघमारे असणार आहेत. यांच्यासोबत प्रमुख उपस्थिती सहकारी संस्था शाहुवाडी चे सहकार अधिकारी अविनाश लाड, पुरवठा अधिकारी शाहुवाडी दादासो शेळके यांची असणार आहे.
कार्यक्रमाचे निमंत्रक संस्थेचे चेअरमन डॉ. जयवंत पांडुरंग पाटील, व्हा. चेअरमन डॉ. रमेश संभाजी पचकर, संचालक रोहन रवींद्र फाटक, मुख्य प्रवर्तक अमर जयवंत पाटील आहेत.
तसेच संस्थेचे संचालक मंडळ ,व्यवस्थापक , कर्मचारी वर्ग, पिग्मी एजेंट व हितचिंतक उपस्थित असणार आहेत.
यावेळी डॉ. संजय यशवंत मगदूम, डॉ.गुरुनाथ बाळासो दळवी, श्री भगवान मारुती पाटील, श्री मानसिंग बापू लोहार, श्री तुकाराम सखाराम तळेकर, सौ. पल्लवी संग्राम पाटील, श्री संजय शंकर वास्कर, डॉ. जयवंत ईश्वरा सागावकर, सौ सुप्रिया कृष्णा पाटील, श्री आप्पासाहेब प. देसाई, श्री हणमंत नारायण शेवाळे, सौ शुभांगी महादेव कुंभार, श्री अशोक वसंत पाटील, श्री उत्तम सदाशिव गुरव, सौ. सुजाता बाळासो रवंदे, श्री राजेंद्र शिवाजी नालुगडे, सौ. स्वाती सुर्यकांत फाटक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

3+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!