‘ सावे ‘ च्या शोभा पाटील यांची संजय गांधी निराधार समिती च्या शाहुवाडी तालुका सदस्य पदी वर्णी


बांबवडे : सावे तालुका शाहुवाडी येथील कर्णसिंह गायकवाड गटाचे खंदे समर्थक विकास पाटील यांच्या पत्नी सौ शोभा विकास पाटील यांची संजय गांधी निराधार समिती च्या शाहुवाडी तालुका सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल बांबवडे पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे. सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने सौ.शोभा विकास पाटील यांचे हार्दिक अभिनंदन.
विकास पाटील हे सावे गावातील त्याचप्रमाणे पिशवी मतदारसंघातील कर्णसिंह गायकवाड गटाचे कट्टर समर्थक आहेत. कर्णसिंह गायकवाड यांनी हे नाव सुचविले असून, त्यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हि नियुक्ती करण्यात आली आहे.

2+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!