स्व.अशोकभाऊं च्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न : ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं घोडे-पाटील कॉम्प्लेक्स मध्ये फायटर ग्रुप च्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यासाठी संजीवन ब्लड बँक चे डॉ.प्रीती राजपूत व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते. स्व. अशोकराव घोडे-पाटील (भाऊ ) यांच्या जयंती चे औचित्य साधून हे रक्तदान शिबीर भरविण्यात आले होते.


स्व. अशोकभाऊ म्हणजे सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळा होता. हे व्यक्तिमत्व समाजशील व्यक्तिमत्व होतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लोकांमध्ये मिसळून असलेलं व्यक्तिमत्व, कधी काळाच्या पडद्या आड गेलं, हे कळलं सुद्धा नाही. अशोकभाऊ व्यवसायाने जरी कंत्राटदार असले, तरी सामाजिक बांधिलकीतून ते कधी वेगळे झाले नाही. अनेक नेत्यांचे त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे अनेक कामांची समाजासाठी त्यांनी निर्गत केली होती.
हे व्यक्तिमत्व जरी काळाच्या पडद्या आड गेले असले, तरी त्यांची भूमिका त्यांचे चिरंजीव स्वप्नील घोडे-पाटील आणि त्यांचे सर्व बांधव निभावत आहेत. एकंदरीत काय घोडे-पाटील घराण्याची समाजाशी असलेली नाळ , हि तरुण पिढी निश्चित पुढे चालवतील, यात शंका नाही.

या रक्तदान शिबिरावेळी रक्तदात्यांसह ग्रामपंचायत सदस्य सुरेश नारकर बापू, रामचंद्र शेळके आप्पा, श्री बाळासाहेब रवंदे निवृत्त सैनिक, डॉ.सुभाष पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिपक शामराव पाटील, डॉक्टर मंडळींसह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

दरम्यान फायटर ग्रुप चे कार्यकर्ते, स्वप्नील घोडे-पाटील, अभिलाष घोडे-पाटील व बंधू उपस्थित होते.

5+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!