” गोकुळ ” च्या मैदानात शाहुवाडी चे ” राजहंस ” : कर्णसिंह गायकवाड
बांबवडे : युवा नेते कर्णसिंह गायकवाड यांनी गोकुळ च्या मैदानात उतरत, पुन्हा एकदा स्व. संजय दादांची आठवण खऱ्या अर्थाने दादांच्या कार्यकर्त्याला करून दिली आहे. एकेकाळी ज्या संजय दादांनी गोकुळ च्या निवडणुकीत भिष्मचार्याची भूमिका बजावली होती, आणि खऱ्या अर्थाने गोकुळ सत्ताधाऱ्यांच्या हवाली केले होते. त्या निवडणुकांच्या काळात दादांनी बजावलेली भूमिका आजही खऱ्या कार्यकर्त्याला विसरता येणार नाही.
आज स्व. संजय दादांच्या शब्दाला पुन्हा एकदा कौल देण्याची वेळ आली आहे. युवा नेते कर्णसिंह गायकवाड यांना गोकुळ च्या निवडणुकीत विजयी करून, स्व. संजय दादांना एक वेगळी श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे. आणि त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता दादांच्या शब्दाला कौल दिल्याशिवाय राहणार नाही, अशीच चर्चा सध्या मतदार संघात ऐकावयास मिळत आहे.
कर्णसिंह गायकवाड हे म्हणजे, शाहुवाडी आणि पन्हाळा तालुक्याच्या कुशीत वावरणारे ‘ राजहंस ‘ आहेत. कारण राजहंस अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा गात असतो. अनेक दु:खे पोटात ठेवून इतरांना समाधान देणाऱ्या पक्षामध्ये राजहंस चे नाव घेतले जाते. अगदी त्याचप्रमाणे स्व. आमदार संजयसिंह गायकवाड यांच्या निधना नंतर कर्णसिंह यांना सगळ्या जनतेने सांभाळण्याचा प्रयत्न केला , पण त्याकाळात गोकुळ च्या सत्ताधाऱ्यांनी दादांच्या नंतर या २५ वर्षीय तरुणाकडे पाठ फिरवली. आणि खऱ्या अर्थाने दुर्दैवाला सुरुवात झाली.
पण परमेश्वराच्या दारी न्याय असतो. म्हणूनच आज राजर्षी शाहू आघाडी च्या माध्यमातून जिल्ह्याचे मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, नामदार हसन मुश्रीफ यांनी कर्णसिंह गायकवाड यांना संधी दिली. संजयदादा गटाच्या कार्यकर्त्याला दादांची इच्छा पूर्ण करण्याची आज संधी आली आहे. युवा नेते कर्णसिंह गायकवाड यांना गोकुळ च्या मैदानात सर्व सामान्य कार्यकर्त्याने दुध संस्था धारकांनी निवडून आणणे, हि नैतिक जबाबदारी बनली आहे.
स्व. आमदार संजयसिंह गायकवाड यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्याची वेळ आली आहे. कर्णसिंह यांना ” गोकुळ ” ची दहीहंडी फोडून विजयी करणे, हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे, आणि संजय दादांचा कार्यकर्ता कर्तव्यात कधीच कमी पडत नाही, यात शंका नाही. ” कर दे फतेह ” मिशन गोकुळ.”