…अन्यथा तीव्र आंदोलान्न केले जाईल : महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मलकापूर : मलकापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या व्यवस्थापकांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आधार कार्ड संदर्भात तक्रार नोंदविण्यात आली. अशा आशयाचे निवेदन मनसे चे मलकापूर शहर अध्यक्ष अजय गुरव यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी ते म्हणाले कि, भविष्यात जनतेशी गैरवर्तन केल्यास मनसे कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा मनसे च्या वतीने देण्यात आला.

यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर, मनसेच्या सहकार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश तांदळे, तालुका उपाध्यक्ष प्रवीण कांबळे, संदीप कांबळे, येळाणे चे ग्रामपंचायत सदस्य रोहित जांभळे व मनसे चे कार्यकर्ते उपस्थित होते.