सर्व सामान्यांच्या वाढदिवसाचे जनक म्हणजे ‘ रामभाऊ शेळके’ आप्पा : त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा


बांबवडे : आयुष्यात सर्वसामान्य माणसाला समाधान मिळण्याची गरज असते. त्याला फार श्रीमंत व्हायचे नसते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:बद्दल विचार करणे, हे सामान्य माणूस विसरला आहे. महाविद्यालयीन काळात होणारे वाढदिवस वगळता त्यानंतर मात्र त्याला कधी असा आनंदाचा प्रसंग सहज सहजी अनुभवायला मिळत नाही. असे असताना सर्व सामन्यांचा एक मित्र मात्र, आपल्या मित्र परिवाराचे वाढदिवस साजरे करतो. त्यावेळी ज्यांचा वाढदिवस असतो, त्यांच्या चेहऱ्यावर येणाऱ्या समाधानात हि व्यक्ती स्वत:चा आनंद मिळवते. अशी व्यक्तिमत्वं समाजात फार कमी असतात. आणि ते आहेत ” रामचंद्र आनंदराव शेळके ” . आज त्यांचा स्वत:चा वाढदिवस आहे. दुसऱ्याच्या सुखात आपले सुख मानणाऱ्या या व्यक्तिमत्वाला, म्हणजेच आमच्या रामभाऊंना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस ब्युज च्या वतीने आमच्या या मित्रांना लाख लाख शुभेच्छा. सर्व सामान्य जनतेच्या वाढदिवसाच्या आनंदाचे ते जनक मानावयास हरकत नाही.


माणसाच्या क्षणभंगुर आयुष्यात कधी चार आनंदाचे क्षण येतात, आणि जातात, हे कळतही नाही. परंतु आमचे रामभाऊ इतरांच्या वेदना कमी करण्याचा नेहमी प्रामाणिक प्रयत्न करीत असतात. आणि त्यांच्या या प्रयत्नांना परमेश्वर यश देखील देतो. इतरांचे वाढदिवस साजरे करणारे हे व्यक्तिमत्व, स्वखर्चाने हे सर्व करीत असते. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र चंद्रकांत नारकर, सुरेश नारकर आणि इतर मंडळी सुद्धा असतात.


आयुष्य हे दुसऱ्यासाठी जगले कि, आपले दु:ख सुसह्य होतात. असे रामभाऊंचे मत आहे. बांबवडे एसटी स्थानकासमोर जयश्री कोल्ड्रिंक्स हे त्यांचे दुकान आहे. हि व्यक्ती हाडाची शेतकरी आहे. पण कधीही कोणतीही तक्रार या माणसाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत नाही.


नेहमीच प्रसन्न वदनाने प्रत्येकाचे स्वागत करणारे रामभाऊ, हे आमचे जीवश्च, कंठश्च मित्र कधी बनले, हे कळले सुद्धा नाही. त्यांचे वडील आनंदराव शेळके हे सुद्धा अशाच स्वभावाचे होते. म्हणून लोक त्यांना आण्णा म्हणत. त्यांचा वारसा रामभाऊंनी पुढे चालवला आहे.


आयुष्यात कष्टाची शिदोरी सोबत असली कि, भूक देखील कमी होते. सर्व सामन्यांचे आशीर्वाद हाच आपला मौलिक ठेवा आहे, असे रामभाऊ शेळके उर्फ सर्वांचे आप्पा यांचे मत आहे.

3+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!