मलकापूर अर्बन ची आर्थिक घोडदौड कौतुकास्पद : श्री अजय लोध


मलकापूर : मलकापूर को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. च्या वतीने सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात आला आहे. संस्थेचा कारभार उत्तम रित्या सुरु असलेने, संस्थेच्या विविध भागात शाखा सुरु करण्यात आल्या असून, ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संस्थेचा पारदर्शी कारभार, तज्ञ संचालक मंडळ , आणि कष्टाळू कर्मचारी वृंद या बळावर संस्थेच्या प्रगतीची घोडदौड सुरु आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्री अजय लोध यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.


यावेळी ते पुढे म्हणाले कि, संस्थेची ३१ मार्च २०२१ रोजी आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. संस्थेकडे सध्या ८०.६२ कोटींच्या ठेवी आहेत.तसेच निधी ९.५० कोटी आहे.संस्थेचे भाग भांडवल १.९९ कोटी असून, गुंतवणूक ३२.२३ कोटी आहेत. या काळात संस्थेने ५७.९३ कोटी रुपयांचे कर्जांचे वाटप केले असून, संस्थेचा चालू वर्षीचा नफा १.११ कोटी झाला आहे.


याचबरोबर संस्थेची ग्राहकांसाठी अनेक वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये संस्थेकडून ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा पुरविली जात आहे. याचबरोबर सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा, व कॅश ट्रान्स्फर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच ठेवींच्या निरनिराळ्या आकर्षक ठेव योजना ग्राहकांसाठी संस्थेने या आर्थिक वर्षात उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्याचबरोबर वेस्टर्न युनियन मनी ट्रान्स्फर सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कर्जदारांसाठी एलआयसी नैसर्गिक विमा योजना , तसेच कर्जदारांसाठी संपूर्ण कर्ज अपघात विमा देण्यात येत आहे. याचबरोबर ग्राहकांसाठी सेफ डिपॉझीट लॉकर्स ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर पंचक्रोशीतील जनतेसाठी अधिकृत वीज बील भरणा केंद्र सुरु करून देण्यात आले आहे. संस्थेच्या मुख्य कार्यालयासहित सर्व शाखा संगणकीकृत आहेत. संस्थेच्या या सुविधांमुळे विविध भागात संस्थेच्या आणखी आठ शाखा सुरु करण्यात आल्या आहेत.


यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन श्री बाळकृष्ण गद्रे,जनरल मॅनेजर श्री राजेंद्र जोशी उपस्थित होते.
मुख्य संस्था मलकापूर फोन नं. ९०११०६९४३५, फोन नं. (०२३२९) २२४२७५, आंबा शाखा फोन नं. ९०११०६९१६७, शाखा शाहुवाडी फोन नं. ८३८००७५४१२,-शाखा कोल्हापूर फोन नं. ९०११०६९४१५, शाखा देवरुख फोन नं. ८२७५४५०३६५,शाखा पाचल फोन नं ९४२१११०४२९, शाखा रत्नागिरी फोन नं. ९०११०६९९५२, शाखा लांजा फोन नं. ९४०४३३०९०९, शाखा चिपळूण फोन नं. ९८५०३५८७१२.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!