बांबवडे त निर्बंधांची ऐशीतैशी , आणि पोलिसांची बघ्याची भूमिका : कोरोना समिती निष्क्रिय


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे इथं निर्बंधांची ऐशीतैशी होत असून, बऱ्यापैकी दुकाने अर्धवट उघडली असून, कोरोना समिती मात्र निवांत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना समिती कोणतीही कार्यवाही करीत नाही. पोलीस चौकीत याविषयी बोलले असता, कोरोना समिती ला सांगा, असे उद्दाम उत्तर पोलीस कर्मचारी सांगत आहेत.
जर पोलिसच बघ्याची भूमिका घेणार असतील, तर मग तपासणी चा फार्स कशासाठी ? असा प्रश्न निर्माण होत आहे.


संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लावले जरी असले, तरी बांबवडे त मात्र वाहने फक्त तोडपानी करण्यासाठीच अडवली जातात, असे निदर्शनास येत आहे. एवढेच नव्हे तर कर्नाटक मधून माणसं जर बांबवडे पर्यंत प्रवास करून येत असतील, तर एवढ्या प्रवासात पोलीस नेमके होते कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. इथं अनेक दुचाकी वाहने तीन सीट्स बसवून विना मास्क समोरून जातात, तरी पोलीस बघ्याची भूमिका घेते.


एवढेच नव्हे तर एक चारचाकी प्रवासी वाहन पोती भरून घेवून येतंय, ते कसे? एक नव्हे तर अनेक प्रश्न उभे आहेत. एवढेच नव्हे तर पोलीस चौकीच्या बाहेरचे मोबाईल दुकान सुद्धा बिनबोभाट सुरु आहे. यावरून बांबवडे पोलीस दूरक्षेत्र चौकी किती कार्यक्षम आहे , हे दिसून येत आहे. इथली चौकी फक्त नावालाच का ? असाही प्रश्न उभा राहतो.

5+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!