बांबवडे येथील डॉ. एस.एन.पाटील नागरी सहकारी पतसंस्था स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील डॉ. एस.एन.पाटील नागरी सहकारी पतसंस्था , तुरुकवाडी ची शाखा बांबवडे इथं आपल्या स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित झाली आहे.

त्याचा उद्घाटन सोहळा १९ एप्रिल२०२१ रोजी सध्या स्वरुपात संपन्न झाला. कोरोना संक्रमणाचा काळ विचारात घेता, संचालक मंडळाने हा कार्यक्रम सध्या स्वरुपात संपन्न केला. बांबवडे येथील अंबीरा ओढ्याजवळ असलेल्या शामराव शेळके बहुउद्देशीय संकुल, संस्थेने स्वमालकीची जागा घेतली आहे.


संस्थेची स्व मालकीची जागा घेतल्याने नव्या जागेचे उद्घाटन बीड चे तहसीलदार सौ शारदा पाटील, तसेच संस्थेचे संस्थापक डॉ.एस.एन.पाटील बापू, , त्याचबरोबर संस्थेच्या चेअरमन सौ उषा शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमास काही मोजकी मंडळी कोरोना चे सर्व नियम पाळून उपस्थित होती. डॉ. एस.एन.पाटील नागरी सहकारी पतसंस्था म्हणजे पूर्वीची भोगेश्वर पतसंस्था होय. या संस्थेंचे संस्थापक सन्माननीय डॉ.एस.एन. पाटील बापू यांनी या संस्थेचे रोपटे सर्वप्रथम तुरुकवाडी इथं लावले होते. जनमानसाला सावकारी व्याजाच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी या संस्थेची निर्मिती झाली. संस्थेच्या माध्यमातून अनेकांनी स्वयंरोजगार सुरु करून, आपल्या संसाराची चूल चालवली. संस्थेकडे २० कोटींच्या ठेवी, आहेत, तर १४ कोटींची कर्जे आहेत. गुंतवणूक ४ कोटींची तर सोनेतारण कर्ज २ कोटींची आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून, सातत्याने ‘अ’ ऑडीट वर्ग प्राप्त करीत आले आहे.


डॉ.एस.एन.पाटील म्हणजे एक बुजुर्ग आणि विश्वसनीय व्यक्तिमत्व आहे. त्यांना सर्वजण बापू म्हणूनच ओळखतात. आज या संस्थेने स्व प्रगतीच्या माध्यमातून स्व मालाकीची जागा बांबवडे सारख्या बाजारपेठेत खरेदी केली. त्या संस्थेचे हे स्व मालकीच्या जागेत पदार्पण होताना, निश्चितच आनंद होत आहे.


या सिमित सोहळ्यास प्रा. अजय पाटील संचालक, तानाजी बामणे जनरल मॅनेजर ,प्रा.एस.पी.पाटील, संजय श्री . पाटील, बांबवडे चे सरपंच सागर कांबळे, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, कृष्णा पाटील, अमर पाटील, शंकर बामणे, शंकर पाटील, सुमंत माळी शाखा अधिकारी, युवराज माईंगडे, अमोल लोखंडे, हरिभाऊ पाटील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.


डॉ. एस.एन.पाटील नागरी सहकारी पतसंस्था ,बांबवडे चे सर्व पदाधिकारी तसेच संस्थेचे संस्थापक बापू व त्यांचे सहकारी मंडळ, कर्मचारी वृंद या सगळ्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने अभिनंदन, आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!