बांबवडे आरोग्यवर्धिनी केंद्रासह उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात लसीकरण : जि.प. स. श्री बोरगे


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे आरोग्यवर्धिनी केंद्रासह उपकेंद्रातही पिशवी मतदारसंघात ४५ वर्षांवरील ८९५७ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे, जि.प. सदस्य विजयराव बोरगे यांनी सांगितले.


यावेळी श्री बोरगे पुढे म्हणाले कि, पिशवी मतदारसंघात १८ गावे व १३ वस्त्यांमध्ये हे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान नांदगाव परिसरातील पाच गावांमध्ये सुद्धा ८० % लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. यामध्ये फ्रंट लाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी व नागरिकांचाही समावेश आहे.


दरम्यान बांबवडे आरोग्यवर्धिनी केंद्रातील डॉक्टर्स ,परिचारिका, व आरोग्यसहाय्यक, व सर्वच कर्मचारी वृंद तत्परतेने काम करीत असल्याचे दिसून येत आहे. असेही श्री बोरगे यांनी सांगितले.


दरम्यान १८ ते ४५ वर्षांच्या मध्ये असलेल्या नागरिकांनी आपल्या नावाची नोंद कोविन अॅप वर करावी, असेही आवाहन श्री बोरगे यांनी केले . यावेळी विक्रम पाटील, याचबरोबर हर्षवर्धन पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!