उदय साखर च्यावतीने ” ऑक्सिमीटर ” प्रदान- श्री मानसिंगराव गायकवाड


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना मदत व्हावी, म्हणून उदयसिंगराव गायकवाड साखर कारखाना व रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती च्या वतीने १०० ऑक्सिमिटर तहसीलदार गुरु बिराजदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन श्री मानसिंगराव गायकवाड यांच्याहस्ते ऑक्सिमीटर सुपूर्द करण्यात आले.


यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक भगवान पाटील, उदय पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष सुरज बंडगर, शरद निकम, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!